Piyush Goyal, Bhushan Patil Sarkarnama
मुंबई

Piyush Goyal : मुंबईत भाजपने थोडीतरी 'पत' राखली; उत्तर मुंबईत पीयूष गोयल 'विनर'

North Mumbai lok sabha election 2024 result Piyush Goyal Vs Bhushan Patil : गोयल हे तब्बल 1 लाख 71 हजार 314 मतांनी आघाडीवर असल्यान त्यांचा विजय निश्चित झाला आहे.

Sunil Balasaheb Dhumal

Uttar Mumbai lok sabha election 2024 Result : मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल विजयी झाले आहेत. त्यांना आतापर्यंत 3 लाख 37 हजार 415 मते मिळाली आहेत. तर त्यांच्या विरोधातील काँग्रेसचे भूषण पाटील यांना 1लाख 66 हजार 101 मते मिळाली आहेत. गोयल हे तब्बल 1 लाख 71 हजार 314 मतांनी आघाडीवर असल्यान त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून मोदी सरकारमधील पहिल्या फळीतले मंत्री पीयूष गोयल आणि मुंबई विभागाचे खजीनदार भूषण पाटील आमने सामने आहेत. भाजपने पीयूष गोयल यांची उमेदवारी जाहीर करून महिनाभर आधीच डाव टाकला. तर काँग्रेसने पाटलांची जेमतेम आठवड्यापूर्वी उमेदवारी जाहीर केली होती. याचा फायदा भाजपला झाल्याचे आता दिसून येत आहे.

भाजपने उत्तर मुंबईतून 70 टक्के मते घेत दोन वेळा खासदार झालेल्या गोपाळ शेट्टींचे तिकीट कापून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना रिंगणात उतरवले. परिणामी भाजपची प्रतिष्ठाच पणाला लागली होती. त्यांना निवडून आणण्यासाठी मित्र पक्षांच्या मदतीने भाजपने मोठी यंत्रणा कामाला लावली.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात ५५ टक्के मतदान झाले. या मतदारसंघातील विधानसभा बोरिवली (६२.५०), दहिसर (५८.१२) मागाठाणे (५५.६६), कांदिवली पूर्व (५४.४८) चारकोप (५७.८३), मालाड पश्चिम (५३.५२) असे मतदान झाले होते. आता येथून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आघाडीवर असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT