Loksabha Election : रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र, उदय सामंत Uday Samant यांच्यासोबत पत्रकार परिषद घेत त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या माघारीनंतर नारायण राणे यांची उमेदवारी भाजपकडून जाहीर करण्यात आली. राणेंचा उमेदवारी अर्ज भरताना किरण सामंत देखील उपस्थित होते. मात्र, रत्नागिरीमधील उदय सामंत यांच्या कार्यालयावरून उदय सामंत यांचा फोटो असलेले बॅनर किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी हटवले आहे. या कार्यालयावरून किरण सामंत यांचे फोटो लावण्यात येणार असल्याचे किरण सामंत यांचे कार्यकर्ते सांगत आहेत.
किरण सामंत Kiran Samant यांचे संपर्क कार्यालय असे बॅनर कार्यालयावरू लागणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यासाठी उदय सामंत यांचे बॅनर हटवल्याने किरण सामंत नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. किरण सामंत यांची याबाबत आपली अधिकृत भूमिका अजून जाहीर केलेली नाही.
सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा ratagiri sindhudurg loksabha मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून किरण सामंत प्रयत्न करत होते. किरण सामंत यांनी सोशलमीडियावर देखील अनेकदा स्टेट्स ठेवत उमेदवारीसाठी आक्रमक पवित्र घेतला होता. एकदा तर त्यांनी ठाकरे गटाची मशाल चिन्ह देखील आपल्या स्टेट्सला ठेवले होते. उमेदवारीसाठी सामंत यांनी नागपूरला जात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली होती.
नारायण राणे यांना उमेदवारीवर जाहीर झाल्यानंतर किरण सामंत हे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित होते. आपण राणे यांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचे देखील जाहीर केले होते. मात्र, आता किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांचे कार्यलयावरील बॅनर काढल्याने उमेदवारी मिळवून देण्यास उदय सामंत यांना अपयश आल्याने किरण सामंत त्यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.