Vivik Phansalkar News
Vivik Phansalkar News Sarkarnama
मुंबई

फणसाळकरांनी कर्तव्य मानले महत्वाचे : मुलीचे लग्न असूनही महामोर्चाच्या सुरक्षेसाठी ड्यूटीवर

सरकारनामा ब्यूरो

Vivek Phansalkar News : मुंबईचे पोलीस (Police) आयुक्त विवेक फणसाळकर (Vivek Phansalkar) यांच्या मुलीचे आज लग्न आहे. मात्र, मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा महामोर्चा असल्याने सुरक्षेसाठी आयुक्त कन्यादान न करता कर्तव्यावर हजर झाले. याचे सर्वच स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. (Mumbai Police Commissioner Vivik Phansalkar News)

सण, उत्सवांमध्येही पोलिसांना कर्तव्यावर राहवे लागते. याला पोलिस आयुक्तही अपवाद ठरले नाहीत. मुलीचे लग्न सोडून त्यांना आपल्या कर्तव्यावर मुंबई करांच्या सुरक्षेत आणि मोर्चाचा पोलिस बंदोबस्त पाहण्यासाठी हजर राहवे लागले. याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. घरात मुलीच्या लग्नाची धामधुम सुरु असतानाही ते मोर्चाचा मार्ग, त्यासाठी तैनात असलेला फौजफाटा आणि सुरक्षा याचा आढावा घेण्यासाठी जातीने हजर राहवे लागले.

दरम्यान, महापुरुषांचा अपमान, मंत्र्यांची वक्तव्य या विधानांविरोधात महाविकास आघाडीने महामोर्चाची हाक दिली होती. आज 12 वाजता रिचर्डसन अँड कृडास, नागपाडा, मुंबई येथून या मोर्चाला सुरवात झाली. या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यात विवेक फणसाळकरही रस्त्यावर उतरून सुरक्षेची योग्य ती खबरदारी घेत होते.

दुसरीकडे त्यांच्या सुकन्या मैत्रयी हिचा आज विवाह पार पडत आहे. असे असताना पोलीस आयुक्त सुट्टी न घेता आघाडीच्या मोर्चासाठी कर्तव्य बजावत आहे. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेसाठी नेटकऱ्यांनी त्यांना सलाम केला. फणसाळकर हे 1989 च्या बॅचचे अधिकारी आहेत. जुलै 2018 मध्ये यांच्याकडे ठाणे पोलीस आयुक्तपदाचा कारभार सोपवण्यात आला होता.

त्यानंतर फणसाळकर यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना काळात जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT