Prakash Ambedkar News : आघाडीचा मोर्चा यशस्वी पण आंबेडकरांच्या भूमिकेमुळे ठाकरेंसमोर पेच

Prakash Ambedkar News : प्रकाश आंबेडकर यांची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका
Uddhav Thackeray, Prakash Ambedkar News
Uddhav Thackeray, Prakash Ambedkar NewsSarkarnama

Prakash Ambedkar News : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व काँग्रेसमूळेच (Congress) सीमाभागातील गावे अविकसित राहिली, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली. तसेच, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या अपयशाचे हे शिंतोडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्वत:वर उडवून घेऊ नये. महापुरुषांच्या अवमानाला विरोध म्हणून शिवसेनेच्या नेतृत्वाखालीच मोर्चा निघायला हवा होता, असे आंबेडकर म्हणाले.

राजकीय आघाडी व आंदोलन वेगवेगळे ठेवल्यास शिवसेनेवर सीमाभागाच्या अविकासाचे शिंतोडे उडणार नाही. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य करायला नको होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात प्रचंड रोष निर्माण झाला आहे, असेही आंबेडकर म्हणाले.

Uddhav Thackeray, Prakash Ambedkar News
Latur Political : विवाह सोहळ्यात कट्टर विरोधक एकत्र, घट्ट धरला एकमेकांचा हात..

महामोर्चाचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे सीमावाद, महाराष्ट्राच्या सीमेवरील गावे आज कर्नाटक, गुजरात, तेलंगणात जाण्याची भाषा करत आहेत. त्यांचा विकासच होत नसेल तर ते काय बोलणार? मात्र, याला जबाबदार कोण? असा खरमरीत सवाल आंबेडकर यांनी केला.

महाराष्ट्रात भाजप सत्तेवर नंतर आले आहे. त्यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच राज्यावर अधिक काळ सत्तेत होते. त्यामुळे विकास न झाल्यामुळे ही गावे आज आक्रोश करत असतील तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस दोषी आहे. शिवसेनेने लवकरात लवकर यातून आपले अंग काढून घेतले नाही तर त्यांच्यावरही याचे शिंतोडे उडल्याशिवाय राहणार नाही, अशा इशाराही त्यांनी दिला.

Uddhav Thackeray, Prakash Ambedkar News
Rashmi Thackeray : रश्मी ठाकरेंचा महामोर्चात सहभाग अन्‌ ठाकरेंच्या 'त्या' विधानाची पुन्हा रंगली चर्चा!

महाविकास आघाडीमध्ये वंचितला घेण्यावरुन राष्ट्रवादी आणि काँग्रेस तयार होतील असे वाटत नाही. आता निर्णय उद्धव ठाकरे यांनी घ्याचा आहे, असेही आंबेडकर म्हणाले. आंबेडकरांच्या या भूमिकेमुळे सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या आहेत. वंचितने शिवसेनेला उघाडीसाठी प्रस्थाव दिला आहे. मात्र, अजून त्यावर निर्णय झालेला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com