मुंबई : भाजप (BJP) नेते आणि राज्याचे विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) हे अडचणीत आले आहेत. मुंबै बँक गैरव्यवहार प्रकरणात दरेकरांना पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस बजावली होती. यानुसार आज दरेकरांनी रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजेरी लावली. यानंतर त्यांची कसून चौकशी सुरू झाली आहे. दरेकरांची चौकशी सुरू झाल्याचे समजताच भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यासमोर जमा झाले आहेत. (Pravin Darekar News)
दरेकरांना मुंबै बँक गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांनी नोटीस बजावली होती. दरेकरांना आज पोलिसांनी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दरेकर आज रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर झाले. यानंतर पोलीस ठाण्याबाहेर भाजपचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने आले आहेत. कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी सुरू केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरेकरांची कसून चौकशी सध्या सुरू आहे. यामुळे दरेकरांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मुंबै बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवणारे भाजप नेते प्रवीण दरेकर अडचणीत आले आहेत. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर यांनी मजूर प्रवर्गातून अर्ज भरला होता. याला आक्षेप घेत तक्रार दाखल करण्यात आली होती. सहकार विभागाने याची चौकशी करुन दरेकरांना अपात्र ठरवले होते. मजूर म्हणून प्रवीण दरेकर हे सदस्यत्वाला अपात्र असल्याचे सहकार विभागाने म्हटले होते.
कामगार असल्याचा दावा करून दरेकर हे 1999 मध्ये कामगार सहकारी संस्थेचे सदस्य झाले. त्यांनी 2016 मध्ये विधान परिषद निवडणुकीपूर्वी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे 2.3 कोटी रुपयांची मालमत्ता होती. त्यांच्याकडे 2.5 लाख रुपयांच्या मासिक उत्पन्नासह 91 लाख रुपयांची रोकड होती. यावरून ते मजूर नसल्याचे दिसून येते, असे सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दरेकरांनी उत्पन्नाचे साधन म्हणून स्वतंत्र व्यवसाय असे नमूद केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.