राजनाथसिंह, निर्मला सीतारामन यांच्यापैकी एकाला लवकरच मिळणार बढती?

केंद्रीय मंत्री राजनाथसिंह (Rajnath Singh) आणि निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांची नावे चर्चेत आली आहेत.
Nirmala Sitharaman and Rajnath Singh
Nirmala Sitharaman and Rajnath Singh Sarkarnama

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह चार राज्यातील यशानंतर भाजपमध्ये (BJP) आता राष्ट्रपती (President), उपराष्ट्रपतिपदाच्या (Vice President) निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्रासह 17 राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशात स्वबळावर किंवा मित्रपक्षांच्या साथीने सत्तेवर असूनही भाजपला या निवडणुकीत आपल्या ताकदीवर उमेदवार निवडून आणणे काहीसे अवघड आहे. यामुळे विरोधकांना मान्य होतील अशा नावांवर भाजपकडून विचार सुरू आहे. यात केंद्रीय मंत्री राजनाथसिंह (Rajnath Singh) आणि निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांची नावे उपराष्ट्रपतिदासाठी चर्चेत आली आहेत.

उपराष्ट्रपती पदासाठी संरक्षणमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन व केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांची नावे आघाडीवर आहेत. राजनाथसिंह व सीतारामन ही भाजप वर्तुळातील वरिष्ठ पातळीवरील नावे आहेत. राजनाथसिंह यांना वाजपेयी व मोदी या दोन्ही सरकारमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. याचबरोबर ते चांगले समन्वयक आहेत. विरोधी पक्षांतील नेत्यांशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. राज्यसभेचे कामकाज चालविण्यासाठी त्यांना या सर्व गोष्टींचा फायदा होऊ शकतो, असा मतप्रवाह भाजपमध्ये आहे. सीतारामन या मोदी सरकारमधील वरच्या फळीतील मंत्री आहेत. अनेक वेळा त्यांनी विरोधकांशी चर्चा करुन संसदेतील कोंडी फोडली आहे. त्यामुळे सीतारामन यांचेही नाव उपराष्ट्रपतिपदासाठी पुढे केले जात आहे.

Nirmala Sitharaman and Rajnath Singh
वाजपेयींशी बरोबरीची मोदींना संधी..राष्ट्रपतिपदी महाजन की खान?

नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारला या निवडणुकीत अण्णाद्रमुक, वायएसआर काँग्रेस, बीजू जनता दल, बसप व अन्य मित्रपक्षांचे मत विचारात घेऊनच उमेदवारांची निवड अंतिम करावी लागणार आहे. भाजपची मते कमी पडत असल्यानेच राष्ट्रपती- उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार निवडताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संघटन कौशल्याचा आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सौम्य स्वभावाचा पुन्हा कस लागणार आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद व उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांना भाजप नेतृत्व व संघाकडून पुन्हा संधी मिळण्याची शक्यता धूसर आहे.

Nirmala Sitharaman and Rajnath Singh
पळून कुणाबरोबर गेली अन् लग्न कुणाबरोबर! राज ठाकरेंचा टोला

विरोधकांचीही मोर्चेबांधणी

भाजपला बहुमतासाठी अजूनही एनडीएबाहेरील 9 हजार 194 मतांची गरज आहेत. यामुळे विरोधी पक्षांनी एकच उमेदवार देण्याबाबत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विरोधी पक्षांचा एक गट यासाठी सक्रिय झाला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ओडिशाचे नवीन पटनाईक, तमिळनाडूचे एम. के. स्टॅलिन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तेलंगणचे के. चंद्रशेखर राव, केरळचे पिनराई विजयन आदी प्रमुख नेत्यांशी संपर्क साधण्यासाठी या गटाने पुढाकार घेतला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशीही संपर्क करण्याचे प्रयत्न डाव्या पक्षांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून सुरू आहेत. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना विरोधकांकडून उमेदवारी जाहीर झाल्यास सध्या भाजपच्या बाजूने असलेल्या पण धर्मनिरपेक्षता, राज्यघटना यावर विश्वास असलेल्या पक्षांचे मन वळविण्यात यश येईल, अशी आशा विरोधी पक्षांच्या गटाला वाटते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com