Mumbai Police Commissioner Deven Bharti orders closure of Social Security Branch, transforming it into Women Crime Unit. Sarkarnama
मुंबई

मोठी बातमी : मुंबईत रेस्टॉरंट, डान्स बारवर धाडी टाकणारी शाखा बंद : पोलीस आयुक्तांचा निर्णय, धिंगाणा पुन्हा सुरु होणार?

Mumbai Police : मुंबईतील रेस्टॉरंट आणि अवैध डान्स बारवरती छापा टाकण्यासाठी प्रसिद्ध असलेली पोलिसांची सामाजिक सुरक्षा शाखा बंद करण्यात येणार आहे.

Hrishikesh Nalagune

Mumbai Police : मुंबईतील रेस्टॉरंट आणि अवैध डान्स बारवरती छापा टाकण्यासाठी प्रसिद्ध असलेली पोलिसांची सामाजिक सुरक्षा शाखा बंद करण्यात येणार आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी हा निर्णय घेतला आहे. या शाखेचे रुपांतर आता महिला विरोधी गुन्हे पथकात होणार आहे.

1981 मध्ये देह व्यापार आणि इतर अमानवीय गुन्हे रोखण्यासाठी सामाजिक सुरक्षेची स्थापना केली होती. कालांतराने शेजऱ्यांमधील वाद, घरगुती वाद, प्रेमविवाहामधील वाद मिटविण्यासाठी या शाखेचा वापर करण्यात येऊ लागला. कालौघात सामाजिक सुरक्षा शाखेचा उद्देश बदलून बेकायदेशीर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि अवैध डान्स बारवरती छापेमारी आणि धाडी टाकण्यासाठी वापर होऊ लागला.

तत्कालिन साहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांच्यामुळे सामाजिक सुरक्षा शाखा प्रचंड चर्चेत आली होती. हॉकी स्टिक घेऊन धडक कारवाई करण्यासाठी वसंत ढोबळे प्रसिद्ध होते. ते धडाधड धाडी टाकायचे. पण हळू हळू वसुली आणि भ्रष्टाचाराचे यामुळे ही सामाजिक सुरक्षा शाखा बदनाम झाली होती.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचे आरोप केले होते. देशमुख यांनी याच सामाजिक सुरक्षा शाखेला 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचे आरोप केले होते. त्यानंतर देशमुख यांना राजीनामाही द्यावा लागला होता. आता हीच सामाजिक सुरक्षा शाखा बंद करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT