Mumbai Serial Blasts : 209 जणांचा मृत्यू पण आरोपी निर्दोष; साखळी बाॅम्बस्फोट प्रकरणात मुंबई हायकोर्टाचा निकाल

Mumbai High Court 2006 Serial Blasts : 11 जुलै 2006 मध्ये मुंबईच्या उपनगरीय माटुंगा रोड , माहिम जंक्शन , वांद्रे , खार रोड , जोगेश्वरी , भाईंदर आणि बोरिवली येथे अवघ्या 11 मिनिटांमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. त्यातील आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
Bombay High Court
Bombay High CourtSarkarnama
Published on
Updated on

2006 Serial Blasts : मुंबईमध्ये 11 जुलैला 2006 मध्ये लोकलमध्ये तसेच रेल्वे स्टेशन परिसरात स्फोट झाले होते. या साखळी  बाॅम्बस्फोटमुळे मुंबईसह महाराष्ट्र हादरला होता. या बाॅम्बस्फोट तब्बल 209 जणांचा मृत्यू झाला होता तर 700 जण जखमी झाले होते. या प्रकरणात तब्बल 12 जणांना सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. पाच जणांना फाशीची तर सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबावर आरोपी हायकोर्टात गेले होते. मुंबई हायकोर्टात या केसचा आज (सोमवारी) निकाल जाहीर झाला. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती एस चांडक यांच्या खंडपीठाने निकाल देताना साखळी बाॅम्बस्फोटमधील 12 आरोपींना निर्दोष मुक्तता केली. पुराव्यांच्या अभावामुळे आरोपींना निर्दोष मुक्तता करण्यात आली. दरम्यान, 12 आरोपींपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे 11 आरोपींची तुरुंगातून सुटका होणार आहे.

11 जुलै 2006 मध्ये मुंबईच्या उपनगरीय माटुंगा रोड , माहिम जंक्शन , वांद्रे , खार रोड , जोगेश्वरी , भाईंदर आणि बोरिवली येथे अवघ्या 11 मिनिटांमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. पोलिसांनी बॉम्बस्फोटात सहभागी असल्याच्या संशयावरून तीन जणांना अटक केली. ताब्यात घेतेले संशयीत हे बंदी असलेल्या सिमी संघटनेशी संबंधित असल्याचे त्यावेळी पुढे आले होते.

Bombay High Court
Parliament Monsoon Session 2025: मोदी Vs इंडिया आघाडी: 'या' मुद्दांवरुन संसदेच्या अधिवेशनात जुंपणार

सरकारला सुप्रीम कोर्टात जाणार?

विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी आरोपींना निर्दोष सोडण्याच्या निकालावर बोलताना सांगितले की, सरकारला पुन्हा निकालचा चाचपणी करून सुप्रीम कोर्टात अपिल दाखल करावे लागेल. जर सुनावनीत शिक्षेवर स्टे मागितला असेल तर आरोपी लगेच तुरुंगाबाहेर येणार नाहीत. सरकारला निकालपत्राचे मुल्यमापण करावे लागले.

न्यायालयाने नोंदवलेले आक्षेप

- साक्षीदारांच्या साक्षीवर विश्वासू ठेऊ शकत नाही

- दोषिंना शिक्षा देण्या इतके पुरावे नाहीत

- घटनेच्या १०० दिवसानंतर साक्षीदारांनी साक्ष नोंदवली त्यामुळे आरोपी साक्षीदार कसे ओळखणार

- आरोपीकडे सापडलेले नकाशे, साहित्य यांचा या घटनेशी संबंधन नसल्याचे दिसते

Bombay High Court
Gujarati language in Mumbai : गुजरात भाजप आमदारानं मुंबईत येत 'मनसे'ला डिवचलं; संपर्क कार्यालयाच्या 'गुजराती भाषे'वर ठाम

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com