Mumbai Municipal Corporation  Srakarnama
मुंबई

BMC Election : मुंबईचा 'किंगमेकर' कोण? इतिहासाची पुनरावृत्ती की नवं समीकरण? 91 प्रभागांतील 'व्होट बँकेवर' कुणाचं वर्चस्व?

Mumbai Municipal Corporation : 1992 च्या इतिहासाची पुनरावृत्ती होतेय का? 91 प्रभागांतील सत्ता संघर्षात मुंबईचा नवा किंगमेकर कोण, जाणून घ्या सविस्तर विश्लेषण.

Rashmi Mane

BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीत शहर आणि उपनगरातील 91 प्रभागांत दलित मतदारांचा प्रभाव असून, ती ‘मतपेढी’ मिळवण्यासाठी विविध राजकीय पक्षांचा आटापिटा सुरू झाला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी विविध दलित पक्षांसोबत आघाडी केली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत दलित मतांची विभागणी होणार आहे, असे म्हटले जात आहे.

मुंबईतील 13 विधानसभा मतदारसंघात दलित मतदारांचा प्रभाव असून, सुमारे 91 प्रभागात त्यांची मते निर्णायक ठरणार आहेत. 1992 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत रिपब्लिक पक्षाचे 12 नगरसेवक निवडून आले होते. त्या वेळी रिपब्लिक गटांच्या ऐक्यासाठी संपूर्ण दलित समाज एकवटला होता.

आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेना, प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा पीपल्स रिपब्लिकन पक्षाने नुकतीच शिवसेनेशी युती केली, तर ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने काँग्रेससोबत हातमिळवणी केली आहे. रिपाइंचे रामदास आठवले मुंबईत 13 जागी लढत आहे, इतर जागी त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे.

त्यामुळे महापालिका निवडणुकीत दलित मतदार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भाजप, शिवसेना (यूबीटी), शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विभागले जाण्याची शक्यता आहे. याचा आता थेट फायदा कोणत्या पक्षाला होणार की या निर्णायक मतांवर दलित उमेदवारच निवडून येत महापालिकेत नगरसेवक होणार हे बघणे महत्त्वाचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT