

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने 100 प्लसचं मिशन हाती घेतले आहे. या मिशनला बळ देण्यासाठी आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच लक्ष घातले आहेत. फडणवीस यांनी पुणे दौऱ्यावर असताना पुण्यातील काही वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेतली. यात निवडणुकीसाठी मार्गदर्शन करून कानमंत्र दिल्याची चर्चा आहे.
महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी (5 जानेवारी) रात्री कात्रज येथे सभा झाली. यात त्यांनी मागील 5 वर्षांमध्ये केलेली कामे आणि भविष्यामध्ये कोणकोणत्या योजना हाती घेणार याबाबतचे व्हिजन मांडले. त्याचसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव न घेता त्यांनी केलेल्या टिकांना प्रत्युत्तर दिले. राज्यकर्त्यांच्या भुतकाळातील चुका दाखवून दिल्या.
ही सभा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एअरपोर्टच्या दिशेने रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील होते. या सर्वांचा एकाच गाडीतून प्रवास झाला. विमानतळावर पोहोचत या तिन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड जवळपास एक तासभर चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे.
पुणे महापालिकेच्या 2017 ची निवडणूक चौरंगी झाली होती. या लढतीमध्ये मतविभाजनाचा फायदा कुठेतरी भाजपाला झाला होता. त्यामुळे भाजपचे तब्बल 99 नगरसेवक निवडून आले होते. यावेळीही पुण्यात युती आणि आघाड्यांचा विचका झाल्याने पुन्हा एकदा 2017 ची चौरंगी लढत्यांची परिस्थिती निर्माण झाली असून पुन्हा एकदा भाजपला पोषक वातावरण तयार झाल्याचं दिसतं आहे.
यावेळी भाजप, शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी अशी चौरंगी लढत पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे. राजकीय जाणकारांच्या मते या समीकरणांचा फायदा भाजपला 125+ या त्यांच्या घोषणेच्या पुर्ततेसाठी होऊ शकतो. चौरंगी लढत झाल्यास मोठ्या प्रमाणात मतविभाजन होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांमध्ये सेक्युलर मतं विभागली जाणार आहेत. शिवसेनेचा विचार केल्यास हिंदुत्ववादी मत विभागली जाण्याची शक्यता असली तरी पुण्यामध्ये शिवसेनेची ताकद इतक्या मोठ्या प्रमाणात नाही. त्यामुळं पुण्यातील भाजपला मानणारी हिंदुत्ववादी मतं एकसंध राहण्याची दाट शक्यता आहे.
मागील 10 वर्षातील पुणे शहरातील लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुका भाजपने एकहाती जिंकल्या आहेत. मेट्रोसह इतर विकासकामांमुळं गेल्या दशकात भाजपाला मानणारा वर्ग पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळं एका बाजूला होणारं मतविभाजन आणि दुसरीकडं भाजपाला मानणारा वर्ग यामुळे भाजपचं मिशन 125 यशस्वी होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.