Bar Dancer BJP Leader Crime .jpg Sarkarnama
मुंबई

Mumbai Crime: मुंबईच्या राजकारणात खळबळ, भाजपच्या बड्या नेत्यावर 'बार डान्सर'चे गंभीर आरोप; बंदुकीचा धाक दाखवत धमकावलं, बलात्कार अन्...

BJP Political Crime News: मुंबईतील दहिसर-बोरिवली भागातील भाजप मंडळाचे महामंत्री सूरज देवडा हे मोठ्या वादात सापडले आहेत. त्यांच्यावर पीडित बार डान्सर तरुणीनं गंभीर आरोप केले आहेत. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News: महाराष्ट्राच्या राजकारणात एकापाठोपाठ एक धक्कादायक घडामोडी घडत आहे. त्यातच राजधानी मुंबईतून राजकीय नेत्यासंबंधी हादरवणारी बातमी समोर आली आहे. भाजप नेत्यावर एका मुंबईतील एका बार डान्सरने लैंगिक शोषणाचे गंभीर केल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मुंबईतील दहिसर-बोरिवली भागातील भाजप मंडळाचे महामंत्री सूरज देवडा हे मोठ्या वादात सापडले आहेत. त्यांच्यावर पीडित बार डान्सर तरुणीनं गंभीर आरोप केले आहेत. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे.

भाजप नेते सूरज देवडा यांच्याशी संबंधित या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणातील आरोपी सध्या फरार असल्याचं समोर येत आहे.

पोलिसांत दिलेल्या तक्रारीत, मुंबईतील दहिसर-बोरिवली भागातील भाजप मंडळाचे महामंत्री सूरज देवडा यांनी पीडित बार डान्सर तरुणीला ते विवाहित असतानाही अविवाहित असल्याचं भासवलं. तसेच तिच्याशी ओळख वाढवत तिला लग्नाचं आमिषही दाखवलं. एवढंच नव्हे तर, एका नामांकित कंपनीत चार्टर्ड अकाउंटंट (सीए) म्हणून नोकरी मिळवून देण्याचं आश्वासनही तिला दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

धक्कादायक बाब म्हणजे पीडित तरुणीकडून आरोपीनं अनेक कारणं सांगत तब्बल 15 लाख रुपये उकळल्याचा गंभीर आरोपही केला आहे. एका बारमध्ये तिच्यावर 50 हजार रुपयांच्या नोटा उधळल्याचा उल्लेखही पीडित तरुणीनं पोलिसांत दिलेल्या तक्रारींत नमूद केलं आहे.

या प्रकरणातील आरोपीनं पीडित बार डान्सर तरुणीला कोल्ड ड्रिंकमधून गुंगीचं औषध देत तिला बेशुद्ध केले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच तिचे आक्षेपार्ह फोटोही आरोपीने काढल्याचा दावाही तक्रारीत केला आहे.

याप्रकरणात आरोपीनं आपल्या दोन सहकाऱ्यांनाही पीडितेचा गैरफायदा घेण्यासाठी प्रवृत्त केल्याचा खळबळ उडवणारा आरोपही केला आहे. या सगळ्या प्रकाराला विरोध केल्यानंतर पीडितेला आरोपीनं बंदूक दाखवून जीवे मारण्याच्या धमकावल्याचंही पोलिसांना दिलेल्या तक्रारीत उल्लेख आहे.

मुंबईच्या राजकीय वर्तुळात या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. यानंतर पोलिसांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील आरोपी सध्या फरार आहे. मात्र, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या निर्देशानंतर तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. सध्या विशेष पथक आरोपीचा शोध घेत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT