Deepak Sawant Sarkarnama
मुंबई

Shivsena UBT Big Shock : खासदारांच्या फुटीनंतर ठाकरेंना मुंबईत महापालिकेत धक्का; नगरसेवकाची सदस्यता रद्द, संख्याबळ घटले, भाजपला थेट फायदा?

Another major setback for Uddhav Thackeray Shiv Sena UBT corporator Deepak Sawant loses BMC membership over invalid caste certificate : खासदारांच्या फुटीमुळे निर्माण झालेली अस्वस्थता अजून कमी झालेली नसतानाच आता मुंबई महापालिकेत पक्षाला आणखी एक मोठा झटका बसला आहे.

Pradeep Pendhare

Mumbai Municipal Corporation News : मुंबईतील राजकीय वातावरण सध्या प्रचंड तापले असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी धक्क्यांवर धक्के बसत असल्याचे चित्र आहे.

आधी खासदारांच्या फुटीमुळे निर्माण झालेली अस्वस्थता अजून कमी झालेली नसतानाच आता मुंबई महापालिकेत पक्षाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. पक्षाचे नगरसेवक दीपक सावंत यांना थेट आपले नगरसेवकपद गमवावे लागले आहे.

मुंबई महापालिकेच्या सभागृहात महापौर रितू तावडे यांनी अधिकृत घोषणा करत दीपक सावंत यांची सदस्यता रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे महापालिका निवडणूक होऊन अवघे सहा महिने झाले असतानाच शिवसेना ठाकरे पक्षासाठी (Shivsena UBT) हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

दीपक सावंत हे नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीत भांडूप येथील ‘एस’ विभागातील प्रभाग क्रमांक 111 मधून ओबीसी आरक्षित जागेवर विजयी झाले होते. मात्र, रत्नागिरी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर अखेर त्यांच्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली.

या कारवाईनंतर मुंबई महापालिकेत शिवसेना ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांची संख्या आता 64 वर घसरली आहे. या जागेवर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भाजपच्या सारिका पवार यांना न्यायालयाच्या अंतिम आदेशानंतर नगरसेवकपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा थेट फायदा आता भाजपला होऊ शकतो.

दरम्यान, आणखी एका महत्त्वाच्या प्रकरणात गोवंडीतील ‘एम-पूर्व’ विभागातील प्रभाग क्रमांक 137 मधील AIMIMचे नगरसेवक श्रमीर रमजान पटेल यांचेही जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले होते. सभागृहात त्यांच्यावरही कारवाईची घोषणा अपेक्षित होती. मात्र न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे त्यांचे सदस्यत्व सध्या कायम राहिले आहे.

आरक्षित जागांवर बनावट किंवा अवैध प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणूक लढवण्याचे प्रकार वाढत असून, मुंबई महापालिकेच्या इतिहासात यापूर्वीही डझनभराहून अधिक नगरसेवकांना आपले पद गमवावे लागल्याची नोंद आहे. दरम्यान, तोंडावर शिवसेनेचा वर्धापनदिन असताना शिवसेना ठाकरे पक्षातील वाढती अस्वस्थता आणि सततचे धक्के राज्याच्या राजकारणात नवे संकेत देत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT