Cm Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Dasara Melava : मैदान शिंदे गटाला मिळणार ; ठाकरे गटाचा अर्ज फेटाळला

Shiv sena : शिवसेनेने ज्या मैदानासाठी अर्ज केला ते आरक्षित असल्याने फेटाळण्यात आला असल्याची मोठी माहिती समोर आली आहे.

सरकारनमा ब्युरो

मुंबई : विजयादशमीनिमित्त मुंबईच्या शिवाजी पार्कवर शिवेसेनेकडून (Shivsena) दरवर्षी दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. या मेळाव्यासाठी शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते राज्यभरातून मुंबईत येतात. मात्र यावर्षी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये चढाओढ सुरू आहे.

मुंबई महापालिकेने या मैदानावर मेळावा घेण्यासाठी कोणाला परवानगी द्यायची याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. या परिस्थितीत वांद्रे-कुर्ला संकुलातील 'एमएमआरडीए'चे (MMRDA) मैदान मिळावे, यासाठी शिंदे गटाच्या आमदारांनी अर्ज केला होता. तो ‘MMRDA’ने स्वीकारला आहे. शिवसेनेने ज्या मैदानासाठी अर्ज केला ते आरक्षित असल्याने फेटाळण्यात आला असल्याची मोठी माहिती समोर आली आहे.

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी यंदाचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे माजी नेते नारायण राणे यांनी उद्धव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आम्ही गेलो तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मैदानही मिळत नाही. खरी शिवसेना शिंदे गटाचीचं आहे. येत्या काळात त्यांना धनुष्यबाणही शिंदे गटालाचं मिळणार आहे, असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी नेत्यांची बैठक झाली. या भेटीत उद्धव यांनी आपला शिवसेना दसरा मेळावा शिवाजी पार्कवर आयोजित करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी शिंदे गटाला गुंड म्हणत शिवसेनेविरोधात बंडखोरी करणारे गुंड असल्याचे म्हटले आहे. बैठकीत उद्धव यांनी नेत्यांना मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना बोलावून दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवण्यास सांगितले आहे.

पक्षाच्या सर्व आघाड्यांनी एकत्र येऊन मेळाव्याची तयारी करावी. शिवसेना कार्यकर्त्यांनी प्रत्येक मुंबईकरांपर्यंत पोहोचून आपली भूमिका पटवून द्यावी. मेळाव्यावरून कोणीही पुढे येऊन देखावा करीत असले तरीही मुंबईकरच आपली ताकद दाखवून फुटीरांना आपटतील. त्यामुळे मेळावा कोणाचा, या चर्चेला अर्थ नाही, असेही ठाकरे या वेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT