nana patole, cm eknath shinde
nana patole, cm eknath shindesarkarnama

Nana Patole : मुख्यमंत्री नाच गाण्यात बिझी, त्यांच्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही !

Nana Patole : राज्यात सुमारे 60 टक्के ओबीसी जनता असून जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे,"
Published on

पुणे :काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (शनिवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलणे टाळले. ओबीसी आरक्षणावरुन नाना पटोले (nana patole)यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.(nana patole critizsize to cm shinde)

नाना पटोले म्हणाले, " पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी नसून भाजप त्यांचे चुकीचे मार्केटिंग करत आहे. केंद्राने ओबीसी जनगणना केली पाहिजे त्याचा फुटबॉल करू नये,"

"काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ओबीसी संघटन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. बंठिया आयोगाने आडनाववरून राज्यात 38 टक्के ओबीसी असल्याचे सांगितले. पण हा डाटा चुकीचा आहे. राज्यात सुमारे 60 टक्के ओबीसी जनता असून जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे," असे पटोले म्हणाले.

nana patole, cm eknath shinde
कुनोमध्ये चित्त्यांची एंट्री : भाजप-कॉंग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू ; थोरांतांनी दिला पुरावा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही नाना पटोले यांनी टीका केली. ते म्हणाले, "गुजरातपेक्षा आम्ही महाराष्ट्रात उद्योग पुढे नेऊ अशी घोषणा केली. परंतु सन 2014 ते 2019 दरम्यान त्यांनी अनेक गोष्टी गुजरातला पाठवल्या आहे. त्यांचे स्वतःचे ही पद कमी झाले असून त्यांना मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले, याबाबत आम्हाला ही दुःख आहे,"

सध्या सुरु असलेल्या कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेबाबत ते म्हणाले, "भारत जोडो यात्रा राजकीय नसून तो देशाला एकत्रित बांधण्याची यात्रा आहे. तिरंगा देशात नेहमी फडकत राहिला पाहिजे अशी त्यांची भावना आहे. त्यामुळे यात्रेत सहभागी होण्याबाबत आमच्या सहकारी मित्रांना निमंत्रण गरज नाही," भाजप लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न करीत आहे, देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, असे पटोले म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com