Mumbai Red Alert, Half Day For Government Employees Sarkarnama
मुंबई

Mumbai Rain News: मुंबईत रेड अलर्ट! सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे, खासगी कंपन्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना

Mumbai Red Alert, Half Day For Government Employees: मुंबईत मुसळधार पावसामुळे आयएमडीने रेड अलर्ट जारी केला आहे. राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी जाहीर करत खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Mangesh Mahale
  • मुंबईसाठी IMD कडून अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी

  • सरकारी आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना दुपारनंतर हाफ डे

  • खासगी कंपन्यांना कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ लागू करण्याच्या सूचना

  • मुसळधार पावसामुळे रेल्वे, रस्ते वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत

Mumbai Rain News: मुंबईसह राज्यातील बहुतांश शहरांमध्ये पावसाचा जोर कायम असून रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. अनेक महामार्गांवर दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या असून काही पुलांवर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. परिस्थिती लक्षात घेता प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मुंबईतील खासगी कंपन्यांना कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना दुपारनंतर अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात कालपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. विविध ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही भागांत रस्ते खचल्याच्या घटना समोर आल्या आहेत, तर अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT