Pune-Mumbai Traffic News: पुणे-मुंबई संपर्क तुटला! तिन्ही मार्गांवरील वाहतूक बंद, मावळमध्ये दरड कोसळली, कुटुंब अडकल्याची भीती

Pune Mumbai Traffic Update:मुसळधार पावसामुळे मावळमध्ये दरड कोसळून कुटुंब अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग, मिसिंग लिंक आणि जुना महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
Pune Mumbai Traffic Update Missing Link
Pune Mumbai Traffic Update Missing Link Sarkarnama
Published on
Updated on

विजय सुराणा

  • मुसळधार पावसामुळे मिसिंग लिंक बंद

  • लोणावळा घाटात मोठी वाहतूक कोंडी

  • दरड कोसळल्यामुळे मुंबई- पुणे महामार्ग बंद

तळेगाव दाभाडे : घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा परिसरातील नवीन मिसिंग लिंकवर दरड कोसळली आहे. पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.

त्यामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग, नवीन मिसिंग लिंक तसेच जुना मुंबई–पुणे महामार्ग या तिन्ही मार्गांवरील वाहतूक दोन्ही दिशांनी पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. दरड हटविण्याचे काम सुरू असून मार्ग सुरक्षित झाल्यानंतरच वाहतूक सुरू केली जाणार आहे.

जूना मुंबई-पुणे महामार्गावरही वाहतूनक कोंडी झाली आहे. उर्से टोलनाक्याजवळही वाहतूक सध्या बंद करण्यात आली आहे. लोणावळा घाटामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांनी प्रवास टाळा असे आवाहन केले जात आहे.

Landslide at Patan (MAVAL)
Landslide at Patan (MAVAL)Sarkarnama

मावळ तालुक्यातील पाटण गावात सोमवारी पहाटे मुसळधार पावसामुळे एका घरावर दरड कोसळून घरातील संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) ३० सदस्यांचे पथक बचावकार्यासाठी रवाना झाले आहे.

मावळ तालुक्यात घटना.

१)पाटण येथे दरड कोसळली असुन एक घर ढगाऱ्याखाली जिविहित हानी नाही.

२)ओझर्डे & सडवली रस्ता वाहुन गेला आहे.संपर्क तुटला आहे.

३)पवनानगर धालेवाडी रस्त्यावर दरड आली आहे. रस्ता बंद आहे.संपर्क तुटला आहे.

४)येळसे पुल पाण्याखाली कामशेत पवनानगर रस्त्यावर पाणी.

५)पवनानगर बाजारपेठ मध्ये दुकानात पाणी शिरले.

६)एक्स्प्रेस हायवेवर ट्राफिक तर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी.

७)पवनाधरण ३७% भरले आहे.

८)सर्वत्र नेटवर्क प्रोब्लेम.

९)आज सर्व शाळांना सुट्टी.

१०)बेबडोहोळ हद्दीच्या रस्त्यावर पाणी अनेक गावांचा संपर्क तुटला आहे ..

११)वडगांव मावळ येथील श्री पोटोबा महाराज मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी

मुंबई गोवा महामार्ग 12 तासाहून अधिक काळ ठप्प

मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक तब्बल 12 तासांहून अधिक काळ विस्कळीत झाली आहे. रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरातील सुकेळी खिंडीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला असून सुमारे 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

प्रवाशांना मोठा फटका

महामार्गावर जवळपास तीन फूट पाणी साचल्याची माहिती समोर आली आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने वाहतूक पूर्ववत करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.

परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी प्रवाशांनी शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com