CM Devendra Fadnavis Rain Update 
मुंबई

Mumbai Rain Update: मुंबईसाठी पुढील 10 ते 12 तास महत्वाचे! पावसापासून बचावासाठी मुख्यमंत्र्यांनी काय दिलाय इशारा?

Mumbai Rain Update: मुंबईत आज जोरदार पाऊस सुरु असून यामुळं जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं आहे. तसंच शाळांना काही भागांमध्ये सुट्ट्याही देण्यात आल्या आहेत.

Amit Ujagare

Mumbai Rain Update: जुलै आणि अर्धा ऑगस्ट महिना उघडीप घेतल्यानंतर पावसानं राज्यातील विविध भागात पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील आणि विदर्भातील काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसंच मुंबईतही आज सकाळपासून सातत्यानं मुसळधार पाऊस सुरु असल्यानं मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झालं आहे.

राज्यासह मुंबईतील पावसाचा यंत्रणांकडून आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत सविस्तर माहिती माध्यमांना दिली. यावेळी मुंबईकरांसाठी पुढील १० ते १२ तास हे महत्वाचे आहेत, त्यांनी काळजी घ्यावी असा इशारा त्यांनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलंय?

मुंबईतील पावसाची परिस्थिती सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, "मुंबईचा जर आपण विचार केला तर आज सकाळी सहा वाजल्या पूर्वीच्या ४८ तासांमध्ये जवळपास २०० मिमी पाऊस पडला. तसंच आज सकाळी सहा वाजल्यापासून सहा ते आठ तासांत १७० मिमी पाऊस मुंबईत पडला आहे. यामध्ये चेंबूरमध्ये सर्वाधिक १७७ मिमी पाऊस पडला आहे.

विशेषतः पावसाचा जोर हा शहरी भागात जास्त आहे. यांपैकी १४ ठिकाणी पाणी साचल आहे. यांपैकी दोनच ठिकाणी वाहतुक तांबवावी लागली बाकी ठिकाणी वाहतूक हळू हळू सुरु आहे. लोकल रेल्वे गाड्यांचा स्पीड काही ठिकाणी मंदावला आहे, पण त्या थांबलेल्या नाहीत"

डॉप्लरनं दिलेल्या माहितीनुसार, "मुंबईतले पुढील १० ते १२ तास पावसाचा अतिशय तीव्र जोर असण्याची शक्यता आहे. मुंबईला रेड अलर्ट देखील देण्यात आलेला आहे. आज पावसाचा जोर वाढल्यानं दुपारच्या सत्रात आपण शाळांना सुट्टी दिली आहे. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना देखील दुपारी चार वाजेपर्यंत कार्यालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. कारण पावसाचा जोर जसजसा वाढेल तसतशा कर्चमाऱ्यांना देखील घरी जाण्यासाठी अडचणी निर्माण होतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT