
Nashik News : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने निफाड सहकारी साखर कारखान्याची (निसाका) उर्वरित जमीन व अन्य मालमत्ता तातडीने विक्री करण्याचे ठरवले आहे. जेएनपीटीला शंभर एकर जागा दिल्यानंतरही कर्ज न फिटल्याचे कारण देत जिल्हा बॅंकेने निसाकाची उर्वरित जागा विकण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. याविरोधात शेतकरी, सभासद व कामगार एकवटले आहेत. त्यामुळे प्रदीर्घ काळानंतर निफाड सहकारी साखर कारखाना पुन्हा चर्चेत आला आहे.
निफाड तालुक्याचे माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वात कामगारांच्या मुलांच्या शिष्टमंडळाने आता थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना निसाका वाचविण्यासाठी साकडे घातले आहे. राऊत यांनीही निसाका बाबात सर्व घडामोडी जाणून घेतल्या आहेत. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार करणार असून संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिलं आहे.
माजी आमदार अनिल कदम यांनी निसाका वाचविण्यासाठी पुढाकार घेतला असून शुक्रवारी नाशिकमध्ये संजय राऊत यांची त्यांनी भेट घेतली. यावेळी कदम यांच्यासमवेत नवनियुक्त शिवसेना तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील, निसाका कामगारांची मुले किरण वाघ, योगेश आढाव, नितीन निकम हेही उपस्थित होते. सत्तेचा दुरुपयोग करुन निसाका गिळंकृत करण्याचा डाव असून आपण यात लक्ष घालावे अशी विनंती शिष्टमंडळाने राऊत यांना केली. त्यानुसार राऊत हे आता निसाकाच्या मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे अनेक राजकीय पुढाऱ्यांना न सोडवता आलेला प्रश्न संजय राऊत सोडवणार का याकडेही लक्ष लागलं आहे.
निसाका भाडेकराराने दिल्यानंतर तीन हंगाम उलटले तरीही सुरू करण्यात आलेला नाही. सत्ताधाऱ्यांच्या कृपाशिर्वादाने नाशिक जिल्हा बँकेच्या माध्यमातून निसाकाची उर्वरित जमीन व इतर मालमत्ता गिळंकृत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सभासद व कामगार संघटनेने त्याविरोधात पुकारलेल्या लढ्याला माझा पूर्णपणे पाठिंबा असल्याचे अनिल कदम यांनी म्हटले आहे.
2022 मध्ये 25 वर्षाच्या भाडेपट्ट्याने निसाका चालवायला देण्यात आला होता. मात्र, चौथ्या हंगामातही तो बंद आहे. कारखान्यात झालेल्या अनेक गैरव्यवहारांची चर्चा कारखाना कार्यक्षेत्रात जोरात सुरू आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला ड्रायपोर्टसाठी जमीन विक्रीद्वारे 76 कोटी रुपये कर्जात जमा झाले असताना सुद्धा बँकेने कारखान्याची उर्वरित 100 एकर जमीन व मालमत्ता विक्रीचा घाट घातल्याचा आरोप होतो आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.