Mumbai CST Sarkarnama
मुंबई

Mumbai: दिल्लीतील सीजेपीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू; नेमकी कशावर असणार बंदी?

Mumbai: कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. त्याचबरोबर इतर अनेक गोष्टींवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

Amit Ujagare

Mumbai: दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. त्याचबरोबर इतर अनेक गोष्टींवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

मुंबई पोलिसांनी मुंबई शहरात १५ दिवसांसाठी जमावबंदीचं १४४ कलम लागू केलं आहे. त्यामुळं २३ जुलैपासून ३ ऑगस्टपर्यंत १५ दिवसांसाठी मुंबई शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

कुठल्या गोष्टींवर असणार निर्बंध अन् सूट?

  1. पाच पेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यास बंदी असणार आहे.

  2. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारच्या मिरवणुकांवर बंदी असेल

  3. मिरवणुकांमध्ये लाऊड स्पीकर, बँड, वाद्ये आणि फटाके वापरण्यावर बंदी असणार आहे.

  4. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

  5. शहरात शांतता राखण्यासाठी तसंच जीवित आणि मालमत्तेचं नुकसान टाळण्यासाठी हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

  6. तर विवाह, अत्यंसंस्कार, शैक्षणिक संस्था आणि सरकारी कार्यालयं, न्यायालये आणि चित्रपटगृहांसाठी यातून सूट राहणार आहे.

  7. पोलिसांची पूर्व परवानगी घेऊन केलेल्या कार्यक्रमांनाही इथं निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे.

सीजेपीचा मोर्चा थेट संसद भवनाच्या दारात

दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीनं काढलेला मोर्चा संसदेच्या दारात पोहोचला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. काही वेळापूर्वी संसदेच्या बाहेरचं गेट बंद करण्यात आलं होतं. आता इथं इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली आहे. मोर्चा दरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्जही केला. तसंच संसद परिसरातील गर्दी पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. सीआयएसएफच्या क्यूआरटीची टीमही इथं तैनात करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT