Mumbai Police Sarkarnama
मुंबई

Mumbai Police : वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीची 1.22 कोटींची फसवणूक; 9 वर्षे सुरू होता कथित प्रकार

Senior police officer wife allegedly cheated of Rs 1.22 crore over nine years : करणी-काळ्या जादूची भीती दाखवून पूजा-विधीच्या नावाखाली पैसे घेतल्याचा आरोप; पतीला प्रकाराची माहिती नसल्याचा तक्रारीत दावा

Pradeep Pendhare

Maharashtra superstition fraud : महाराष्ट्रात भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली आर्थिक फसवणुकीचे प्रकार सुरूच असल्याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे.

मुंबई पोलिस दलातील एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीची कथित मांत्रिकाने तब्बल 1 कोटी 22 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार तब्बल नऊ वर्षे सुरू होता आणि पतीला त्याची माहिती नव्हती.

या प्रकरणी रहीशमिया आणि अस्मा रहीशमिया यांच्याविरोधात नवी मुंबईतील (Mumbai) एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तक्रारदार महिला पती आणि मुलीसह सीवूड परिसरात राहतात. सुमारे दहा वर्षांपूर्वी त्यांच्या घरात सुखशांती नसल्याने त्या धार्मिक विधी करत होत्या. याच काळात जालन्यातील एका बाबाने त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट असल्याचे सांगितल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने उत्तर प्रदेशातील एका मांत्रिकाचा संपर्क क्रमांक महिलेला दिला.

तक्रारीनुसार, संबंधित मांत्रिकाने महिलेच्या मनात त्यांच्या घरावर करणी आणि काळी जादू झाल्याची भीती निर्माण केली. कुटुंबाच्या जीविताला धोका असल्याचे सांगत विविध पूजा, धार्मिक विधी आणि मंत्र-तंत्र करण्याच्या नावाखाली महिलेकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. या विधींपैकी काही ऑनलाइन (Online) पद्धतीने करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. तसेच आरोपींपैकी एकाने सीवूड येथील महिलेच्या घरी येऊन पूजा केल्याचा दावा करण्यात आला आहे.

करणी आणि काळी जादू दूर करण्याच्या नावाखाली महिलेकडून नऊ वर्षे पैसे घेतले जात असल्याचा आरोप आहे. पती पोलिस खात्यात वरिष्ठ पदावर असल्याने महिलेने हा प्रकार त्यांच्यापासून लपवून ठेवला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पत्नीच्या वाढत्या खर्चाबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना संशय आला. त्यानंतर त्यांनी चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आल्याचे तक्रारीतून समोर आले. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे रहीशमिया आणि अस्मा रहीशमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

नाशिकमधील अशोक खरात प्रकरणामुळे भोंदूगिरी, अंधश्रद्धा आणि त्यामागील कथित आर्थिक व्यवहारांचा मुद्दा राज्यभर चर्चेत आला होता. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या कुटुंबाशी संबंधित हा प्रकार समोर आल्याने भोंदूगिरीविरोधातील कारवाईचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपींवरील आरोपांची सत्यता न्यायालयीन प्रक्रियेत निश्चित होणे बाकी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT