Mumbai Traffic Police News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांना अशाप्रकारचा व्हॉट्स अॅप मेसेज आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांना मिळालेल्या मेसेजमध्ये पंतप्रधान मोदींना लक्ष्य करून स्फोट घडवण्याबाबत म्हटलं गेलं आहे.
तर या मेसेज प्रकरणाबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या क्रमांकावरून हा मेसेज आला होता. त्या मेसेजकर्त्याचा ठिकाणा राजस्थानमधील अजमेरचा दिसून आला आहे. यानंतर संबंधितास पकडण्यासाठी पोलिसांचे पथक तत्काळ अजमेरला रवाना झाले आहे.
याशिवाय पोलिस अधिकाऱ्यांनी हेही सांगितले की, मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनवर पहाटे एक व्हॉट्स अॅप मेसेज आला होता. ज्यामध्ये पाकिस्तानची गुप्तचरसंस्था 'आयएसआय'चा उल्लेख केला गेला होता. याशिवाय त्या मेसेजमध्ये पंतप्रधान मोदींना(Modi) निशाणा बनवून स्फोट घडण्याची योजना असल्याबाबतही सांगण्यात आले होते.
पोलिस अधिकरी म्हणाले, तपास अधिकाऱ्यांना संशय आहे की मेसेज पाठवणारा व्यक्ती मानसिकदृष्ट्या विक्षिप्त आहे, किंवा त्यांने मद्यपान केलेले असावे. या प्रकरणाचा तपास केला जात आहे. तसेच या प्रकरणी एफआयआर नोंदवला गेला आहे. याआधीही मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनवर अनेक खोट्या धमक्यांचे मेसेज आलेले आहेत.
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांना 50 लाखांची खंडणीसाठी धमकी मिळाली आहे. यानंतर झारखंडमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होवू लागले आहेत. या प्रकरणावरून भाजपने झारखंडच्या हेमंत सोरेन सरकारवर निशाणा साधत म्हटले आहे की, या सरकारमध्ये सर्वसामान्यांपासून ते विशेष लोकांपर्यंत सर्वचजण त्रस्त आहे मात्र सरकार मस्त आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.