Union Minister Sanjay Seth : 'लाल सलाम' मेसेज पाठवून थेट केंद्रीयमंत्र्यास मागितली गेली 50 लाखांची खंडणी!

Union Minister of State for Defense Sanjay Seth News : जीवे मारण्याची धमकीही दिली गेली; भाजपने हेमंत सोरेन सरकारवर साधला निशाणा, म्हटले...
Sanjay Seth
Sanjay SethSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Seth Received threat News : केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांना 50 लाखांची खंडणीसाठी धमकी मिळाली आहे. यानंतर झारखंडमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होवू लागले आहेत. या प्रकरणावरून भाजपने झारखंडच्या हेमंत सोरेन सरकारवर निशाणा साधत म्हटले आहे की, या सरकारमध्ये सर्वसामान्यांपासून ते विशेष लोकांपर्यंत सर्वचजण त्रस्त आहे मात्र सरकार मस्त आहे.

भाजप(BJP) आमदार सीपी सिंह यांनी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करत म्हटले की, हेमंत सोरेन सरकार आघाडीचे सरकार आल्यापासून कायदा, सुव्यवस्था बिघडलेली आहे. आजही त्यांचे सरकार आहे. आपण लोक म्हणायचे की, हेमंत आहे तर हिंमत आहे. हेच कारण आहे की आपल्या केंद्रीय सुरक्षा राज्यमंत्र्यांना धमकी दिली जात आहे आणि पैसे मागितले जात, खंडणी मागितली जात आहे. तसेच, आम्ही सातत्याने सांगत होतो की कायदा आणि सुव्यवस्था ठीक करा, मात्र यांचे पोलिस चलान कापण्यातच अडकेलेले आहेत. सीपी सिहं यांनी असेही म्हटले आहे.

प्राप्त माहितीनुसार रांचीचे खासदार केंद्रीय सुरक्षा राज्यमंत्री यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून 50 लाखांची खंडणी मागितली गेली आणि पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली गेली होती. एवढंच नाहीतर मेसेजमध्ये 'लाल सलाम'चाही उल्लेख करण्यात आला आहे. यानंतर रांचीचे खासदार आणि केंद्रीय सुरक्षा राज्यमंत्र्यांनी याबाब पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

Sanjay Seth
Priyanka Chaturvedi : संसदेत सापडलेल्या नोटांच्या बंडल प्रकरणात शिवसेनेच्या चतुर्वेदींनी व्यक्त केली मोठी भीती...

याशिवाय, याप्रकरणी काँग्रेसचीही(Congress) प्रतिक्रिया समोर आली आहे. पक्षाचे आमदार राधाकृष्ण किशोर यांनी म्हटले की, धमकी कुणालाही मिळू शकते. त्यांनी तक्रारही नोंदवली असणार, आता पोलीस त्यावर कारवाई करतील. तसेच राधाकृष्ण यांनी म्हटले की, हेमंत सोरेन सरकार अशाप्रकारच्या प्रकारच्या प्रकरणांमध्ये अतिशय गंभीर आहे, आरोपींना सोडले जाणार नाही.

Sanjay Seth
Abhishek Singhvi Net Worth : संसदेत सिंघवींच्या बाकाखाली सापडले नोटांचे बंडल; राज्यसभेत गोंधळ अन् चौकशीचा आदेश...पाहा VIDEO

तर सुरक्षा राज्यमंत्र्याना खंडणी मागण्या मुद्य्यावर झारखंड मुक्ति मोर्चाकडूनही(JMM) भूमिका स्पष्ट केली गेली आहे. पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस सुप्रयो भट्टाचार्य यांनी म्हटले आहे की, गुन्हेगारी घटना राज्य सरकार प्रायोजित नसते. दिल्ली पोलिसांकडे प्रकरण नोंदवलं गेलं आहे आणि तेथील पोलिसांनी झारखंड पोलिसांशी संपर्क साधला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com