Mumbai University Sarkarnama
मुंबई

MU Senate Election : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा वाद चिघळणार; स्थगितीनंतरही स्वीकारले शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज

Yuvasena Meets Voice Chancellor : शिवसेना युवा सेना उमेदवारांनी घेतली कुलसचिव, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : मुंबई विद्यापीठाची 2023 ची सिनेट निवडणूक प्रक्रिया गुरुवारी रात्री अचानक रद्द करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया का रद्द करण्यात आली याचा जाब शुक्रवारी शिवसेना युवा सेनेचे माजी सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुनील भिरुड यांची भेट घेऊन जाब विचारला. दरम्यान, निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देल्यानंतरही शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज स्विकारल्याने उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. (Latest Political News)

युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई आणि माजी सिनेट सदस्यांनी निवडणूक प्रक्रिया रद्द होण्याबाबतचा जाब कुलसचिवांना विचारला. यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मतदार यादीत त्रुटी असल्याची तक्रार उच्च व तंत्रशिक्षणमंत्री यांना केल्याची दखल घेऊन स्थगिती देण्यात आल्याचे कुलसचिवांकडून सांगण्यात आले. यामुळे या निवडणुकीत भाजपने खोडा घातल्याची चर्चा आहे. परिणामी मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीवरून ठाकरे गट-मनसे-भाजपमध्ये आमने-सामने ठाकले आहेत.

निवडणूक प्रक्रिया स्थगिती देण्यात आल्यानंतरही शिवसेना युवा सेना ठाकरे गटाच्या दहा सिनेट उमेदवारांचे अर्ज स्वीकारले आहेत. यात प्रदीप सावंत, मिलिंद साटम, परम यादव, अल्पेश भोईर, किसन सावंत (सर्वसाधारण). स्नेहा गवळी (महिला), शीतल शेठ (अनुसूचित जाती), मयूर पांचाळ (ओबीसी), धनराज कोहचडे (अनुसूचित जमाती), शशिकांत झोरे (एनटी) यांचा समावेश आहे. स्थिगितीनंतरही शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज स्विकारल्याने या निवडणुकीला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ९ ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठाकडून सिनेट निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र विद्यापीठाकडून जाहीर केलेल्या सिनेट निवडणुकीस अचानक स्थगिती दिली आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे सर्वच पक्षांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. शिवसेना ठाकरे गट व मनसेसह इतर विद्यार्थी संघटनांनी सत्तधाऱ्यांवर निशाणा साधत निवडणूक स्थगित होण्यास जबाबदार धरले आहे. यामुळे राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT