Senate Election News : निवडणूक स्थगितीसाठी 'पहाटेचा मुहूर्त' शोधला नाही? अमित ठाकरेंचा सरकारला खोचक टोला !

MU Senate Election : अमित ठाकरे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार आहेत.
Senate Election News
Senate Election News Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai University Senate Election News : मुंबई विद्यापीठाच्या निवडणुका स्थगित करण्यावरून मनसेच्या विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपला डिवचले आहे. दिल्लीतील सत्ताधीशांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सत्तेत आलेल्यांनी हुकूमशाहीचा कारभार सुरू केल्याचा आरोप करीत, अमित यांनी भाजपला झोडपून काढले आहे.

ही निवडूक ‘रातोरात’ स्थगित करण्याचे कारण काय, असा सवाल त्यांनी केला आहे. त्यासाठी ‘पहाटेचा मुहूर्त’ शोधला नाही, यासाठी आभार मानूनही अमित यांनी राज्यपाल-सत्ताधाऱ्यांना चिमटा काढला आहे. (Latest Marathi News)

Senate Election News
BJP Vs MNS : आम्ही फोडाफोडी करत नाही, मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोक येतात; बावनकुळेंचा राज ठाकरेंवर पलटवार..

आठवड्यापूर्वीच मुंबई विद्यापीठाने या निवडणुका जाहीर केल्या होत्या, मात्र आठ दिवसांतच शिंदे-फडणवीस सरकारने परिपत्रक काढून जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती दिली आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेत शिंदे - फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.

अमित ठाकरे हे राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांना सिनेट निवडणुकांबाबत पत्र लिहीत संताप व्यक्त केला आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक रद्द करण्यासाठी पहाटेचा मुहूर्त शोधला नाही, याबद्दल आभारी आहे असा खोचक टोला अमित ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला लगावला आहे.

Senate Election News
Solapur Loksabha Election : शरद पवारांनी मला सोलापूर लोकसभेची तयारी करायला सांगितले आहे; राष्ट्रवादी नेत्याचा गौप्यस्फोट

अमित ठाकरे (Amit Thackeray) राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार आहेत. उद्या शनिवारी दुपारच्या दरम्यान मनसेचं शिष्टमंडळ राज्यपाल बैस यांची भेट घेणार आहे. सिनेट निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना ऐनवेळाी निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थी संघटना सरकारवर आक्रमक होत, टीका केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com