Mumbai University Sarkarnama
मुंबई

Mumbai University Senate Election Result: युवासेना की अभाविप? मुंबई विद्यापीठात कोण मारणार बाजी, मतमोजणी सुरु

Mangesh Mahale

Mumbai News: मुंबई विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदवीधारकांच्या जागांसाठी मंगळवारी (ता.24)मतदान झाले. त्यांची मतमोजणी आज होणार आहे. सिनेटच्या निवडणुकीत (mumbai university senate election) ठाकरे गटाची युवासेना आणि भाजपची विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात थेट लढत होत आहे.

छात्रभारती, मनसेनेही आपले उमेदवार या निवडणुकीत उतरवले आहेत, पण खरी लढत ही युवासेना अन अभाविपमध्ये आहे. दुपारपर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या 10 जागांसाठी 28 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

युवासेना (Yuvasena)अन् अभाविपने (abvp) सर्व दहा जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. तर छात्रभारतीने चार, मनसेनं (MNS) एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे.शिवसेना शिंदे गटाकडून एकही उमेदवार सिनेटच्या निवडणुकीत उतरवण्यात आलेला नाही.

एकूण ३८ मतदान केंद्रावर आणि ६४ बूथवर सिनेट निवडणुकीसाठी मतदान झाले. मतदारांची एकूण संख्या १३,४०६ इतकी आहे. एकूण मतदानाच्या फक्त 55 टक्के मतदान झालं.निवडणुकीची मतमोजणी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट परिसरात सकाळी ९ वाजल्यापासून सुरू झाली आहे.

आदित्य ठाकरे यांची युवासेना 2018 ची पुनरावृत्ती करणार की अभाविप सिनेट निवडणुकीमध्ये मुसंडी मारणार, याचा फैसला दुपारपर्यंत होणार आहे. दोन वर्षांनी विद्यापीठाच्या अधिसभेत नोंदणीकृत पदवीधरांचे निवडून आलेले प्रतिनिधी विद्याथ्यांचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

पहिल्यांदाच सिनेट निवडणुकीची मतमोजणी सीसीटीव्हीच्या निगराणीखाली पारदर्शकपणे होत आहे.एकूण 7200 मतपत्रिका आहेत. मतपत्रिकांची छाननी होऊन वैध अवैध मतपत्रिका बाजूला केल्या जात आहेत. पाच आरक्षित आणि पाच खुल्या प्रवर्गातील जागांसाठी कोटा ठरवला गेल्यानंतर पसंती क्रमांकानुसार मतमोजणी सुरू होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT