Uddhavrao Jagtap Sarkarnama
मुंबई

Mumbra Shivsena Shakha : मुंब्र्यातील शाखा माझ्या नावावर, ठाकरेंच्या टीकेला अर्थ नाही; उद्धवराव जगतापांचे आव्हान

Shinde Vs Thackeray : मुंब्र्यातील शिवसेनेची शाखा पाडली नसून पुनर्बांधणीसाठी ती तोडली आहे, त्यामुळे शाखेच्या पुनर्बांधणीसाठी आमचं समर्थन आहे.

Vijaykumar Dudhale

Thane News : मुंब्र्यातील शिवसेनेची शाखा पाडली नसून पुनर्बांधणीसाठी ती तोडली आहे, त्यामुळे शाखेच्या पुनर्बांधणीसाठी आमचं समर्थन आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार राजन विचारे यांच्याकडून होणाऱ्या टीकेला काहीही अर्थ नाही. काही दमच नाही. फुग्यातील हवा गेलेली आहे. बाळासाहेबांचे पुत्र म्हणून उद्धव ठाकरे यांचा आम्हाला आदर आहे. त्यांनी मुंब्र्यात येऊन हिंमत करावी. ते करणार नाहीत. पण, त्यांनी ती हिंमत करावी, मग पुढं काय होतंय, ते पाहावं, असं आव्हान ज्येष्ठ शिवसैनिक उद्धवराव जगताप यांनी उद्धव ठाकरेंना दिलं होतं. पण, पण, उद्धव ठाकरे यांनी पोलिसांशी चर्चा करून शाखेकडे रवाना झाले आहेत. (Shiv Sena branch in Mumbra in my name: Uddhavrao Jagtap)

मुंब्र्यातील शिवसेनेची शाखा शिंदे गटाने ताब्यात घेतली आहे. ती शाखा पाडून त्या ठिकाणी कंटेनर आणून ठेवण्यात आला आहे. त्यातून शिंदे गटाचे कार्यकर्ते काम पाहत आहेत. त्यावरून शिंदे गट आणि उद्वव ठाकरे गट आमने-सामने आला आहे. शिंदे यांच्याकडून ९४ वर्षीय उद्धवराव जगताप हे घटनास्थळी आले आहेत. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्धवराव जगताप यांनी स्पष्ट केलं की, मुंब्र्यातील शिवसेनेची शाखा माझ्या नावावर आहे. शिवसेनेची शाखा असल्यामुळे आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच असणार आहे. ही शाखा आनंद दिघे यांच्या कार्यकाळात बांधण्यात आली आहे, त्या वेळी मी उपस्थित होते. त्यांनी मला सांगितले की, ‘उद्धवराव, ही मुंब्र्याची शाखा तुमच्या नावावर करायची आहे, ’ त्यावेळी मी त्यांना म्हटलं की, तुम्हाला माझ्या नावावर शाखा करायची असेल तर करा. माझं काही म्हणणं नाही. कारण शिवसेनेचे आमच्यावर संस्कार आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही जन्मभर विसरणार नाही. प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास लाभलेला मी शिवसैनिक आहे, असेही जगताप यांनी स्पष्ट केले.

मुंब्र्यातील शाखा पाडलेली नाही. ती शाखा पुनर्बांधणीसाठी तोडली आहे. शाखा पाडल्यानंतर जी कामं होत नव्हती, ती यापुढे अव्याहतपणे लोकांची कामं होणार आहेत, त्यामुळे शाखेच्या पुनर्बांधणीसाठी आमचं समर्थन आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार राजन विचारे यांच्याकडून होणाऱ्या टीकेला काहीही अर्थ नाही. काही दमच नाही. फुग्यातील हवा गेलेली आहे. बाळासाहेबांचे पुत्र म्हणून उद्धव ठाकरे यांचा आम्हाला आदर आहे. त्यांनी मुंब्र्यात येण्याची हिंमत करावी. ते करणार नाहीत. पण, त्यांनी ती हिंमत करावी; मग पुढं काय होतंय ते पाहावं, असे आव्हानही त्यांनी दिले आहे. पण, उद्धव ठाकरे यांनी पोलिसांशी चर्चा करून शाखेकडे रवाना झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT