Narayan Rane Bungalow
Narayan Rane Bungalow  sarkarnama
मुंबई

राणेंना दुहेरी दणका; केंद्राच्या नोटीसीनंतर महापालिकेचीही कारवाई?

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा मुंबईतील अदीश आणि मालवण येथील निलरत्न बंगला अडचणीत सापडला आहे. आज पालिकेचे (Mumbai Municipal Corporation) अधिकारी राणेंच्या आदीश बंगल्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू येथील Adhish बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार करण्यात आली होती.

या तक्रारीनंतर बंगल्याची तपासणीसाठी मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. 18 फेब्रुवारी रोजी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आज सकाळी दहा वाजता महापालिका पथक सांताक्रुज पोलिस स्टेशन येथे रवाना झाले आहे. त्यानंतर तिथून सकाळी 11 वाजता जुहू येथे पोहोचणार आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्या बंगल्यावर काय कारवाई होते हे पाहण्याचे ठरणार आहे. तर दुसरीकडे राणे यांचा मालवण येथील बंगला अडचणीत सापडला आहे.

केंद्र सरकारनेच (Central Government) 9 ऑगस्ट 2021 ला दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारने (State Government) हालचाली सुरू केल्या आहेत. राणे यांच्या मालवणी येथील निलरत्न बंगला बांधताना सीआरझेड 2 चे उल्लंघन झाले अशी तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी  केली होती. त्यांतर केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरनला कारावाई करण्याचे आदेश 9 ऑगस्ट 2021 ला दिले होते.

दरम्यान, पालिकेच्या नोटीसनंतर राणे आक्रमक झाले होते. राणे यांनी आपल्या बंगल्यात एका इंचाचेही अनधिकृत बांधकाम नसल्याचा दावा केला होता. तर भाजप आमदार नितेश राणे यांनी पालिकेच्या नोटीसला योग्यवेळी प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला होता. महानगरपालिकेने जुहूतील बंगल्याच्या पाहणीसंदर्भात नोटीस बजावल्यानंतर राणे यांनी ठाकरे कुटुंबीयांवर पलटवार केला होता. उद्धव ठाकरे यांनी मातोश्री-१, मातोश्री-२ बांधले, तेव्हा आम्ही काही म्हणालो का, असा सवाल केला होता. भाजप-शिवसेनेची सत्ता असताना पैसे देऊन मातोश्रीवरील अनधिकृत बांधकाम नियमित करण्यात आले, असा आरोपही केला होता. माझ्या जुहूतील बंगल्याविषयी राजकीय सूडबुद्धीने कारवाई होत आहे, असेही राणे म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT