देवेंद्र फडणवीस आज महापालिका निवडणुकीचा बिगुल फुंकणार?

देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा अन्‌ अनेक जुन्या, नव्या कामांची उद्‌घाटने
Devendra Fadanvism Ex. Chief Minister
Devendra Fadanvism Ex. Chief MinisterSarkarnama

नाशिक : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या उपस्थितीत आज दुपारी भारतीय जनता पक्षातर्फे (BJP) महापालिकेच्या (NMC) निवडणुकीचा बिगुल फुंकला जाईल. श्री. फडणवीस यांचे दुपारी दीडला शहरात आगमन होत असून, कार्यकर्ता मेळाव्यासह सायंकाळपर्यंत त्यांच्या हस्ते विविध कामांची उद्‌घाटने होतील.

Devendra Fadanvism Ex. Chief Minister
महापालिकेसाठी मास्टरस्ट्रोक; शिवसेना उपनेतेपदी सुनील बागुल

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसची महाविकास आघाडी सत्तेत असली, तरीही महापालिकेच्या आगामी निवडणुकीत पालकमंत्री छगन भुजबळ कितीही सांगत असले, तरीही महाविकास आघाडी एकत्र लढेल काय, याबद्दलचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेच्या जोडीला जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची पूर्वतयारी एकीकडे सुरू केली असताना, शिवसेना आणि काँग्रेसतर्फे स्वतंत्रपणे तयारी केली जात आहे.

Devendra Fadanvism Ex. Chief Minister
राज्यमंत्री पवारांच्या घरी निघालेल्या काँग्रेस आंदोलकांना अटक

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सातत्याने स्वबळावर लढण्याबद्दल सांगत आहेत. ही बाब श्री. भुजबळ यांच्या निदर्शनातून सुटलेली नाही. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून राष्ट्रवादीसह काँग्रेस आणि शिवसेनेचे गणित कसे जुळणार, हाही प्रश्‍न कायम आहे. नेमक्या अशा राजकीय परिस्थितीच्या जोडीला राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ११ मार्चपासून मुंबईत होत असल्याने श्री. फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्याला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे.

शहरात कार्यकर्ता मेळावा

श्री. फडणवीस यांचे औरंगाबादहून विमानाने ओझर विमानतळावर दुपारी एकला आगमन होईल. दुपारी सव्वादोनला ते गोविंदनगरमधील मनोहर गार्डनमध्ये पोचतील. तेथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होईल. दुपारी चारला श्री. फडणवीस पाथर्डी फाटा येथे पोचतील. तेथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होईल. सायंकाळी साडेपाचला सातपूरमधील शिवाजीनगरमध्ये वसंतराव कानेटकर उद्यान आणि सावरकर रुग्णालयाचे लोकार्पण होणार आहे. सायंकाळी साडेसहाला श्री. फडणवीस मोटारीने ओझर विमानतळाकडे निघतील. सायंकाळी सातला विमानाने ते नागपूरकडे प्रयाण करतील.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com