Eknath Shinde-Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Mahapalika Election : फडणवीस मुंबईबाहेर असतानाच एकनाथ शिंदेंचा टायमिंग शॉट : ठाणे, कल्याण-डोंबिवलीला तब्बल 200 कोटींची भेट

Eknath Shinde Urban Development Department : सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी इचलकरंची, सांगली, पुणे आणि पनवेल येथे दौरा करताना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यांचे अनावरण केले.

Rajanand More

Pre-election fund allocation : राज्य निवडणूक आयोगाकडून सोमवारी २९ महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. दुपारी चार वाजता मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी हा कार्यक्रम जाहीर करताच या महापालिकांच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू झाली. पण त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्राचा झंझावती दौरा करत विकासकामांच्या उद्घाटनासह पुतळ्यांच्या अनावरणाचा धडाका लावला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही मागे राहिले नाहीत.  

विकासकामांचे उद्घाटन होत असतानाच राज्य सरकारने सोमवारी १५ विभागाशी संबंधित ४९ शासन निर्णय काढले. यामध्ये सर्वाधिक १९ शासन निर्णय एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगर विकास खात्याशी संबंधित आहेत. सरकारने काढलेल्या १९ शासन निर्णयांतून विविध महापालिकांच्या कामांसाठी ५०० कोटींहून अधिक रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

शिंदेंकडील नगर विकास विभागाने ठाणे महापालिकेसाठी १०२ कोटी, कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी ८० कोटी, बृहन्मुंबई महापालिकेसाठी १५ कोटी तर नाशिक महापालिकेसाठी नऊ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. इतरही शासन निर्णयांमध्ये सामाजिक न्याय विभागाचे सात, गृह विभाग, ग्राम विकास व नियोजन विभागाचे प्रत्येकी तीन जीआर आहेत.

मृदा व जलसंधारण, शालेय शिक्षण, गृहनिर्माण, सामान्य प्रशासन विभागाचे प्रत्येकी दोन तर इतर मागास विभाग, पर्यटन, सार्वजनिक आरोग्य, अल्पसंख्यांक, विधी व न्याय आणि कृषी व पशुसंवर्धन विभागाचे प्रत्येकी एक शासन निर्णयही काढण्यात आला आहे. त्यापैकी बहुतेक जीआर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काढण्यात आले आहेत.

दरम्यान, सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी इचलकरंची, सांगली, पुणे आणि पनवेल येथे दौरा करताना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यांचे अनावरण केले. तसेच  तसेच, या ठिकाणी विविध कामांचे उद्घाटन केले. या घाईगडबडीतील

SCROLL FOR NEXT