Mangalprabhat lodha (BJP) Sarkarnama
मुंबई

शिवसेना सोयीने वाॅर्ड फोडणार; त्या आधीच भाजपच्या नेत्यांनी उचलली पावले

या प्रभागसीमा बदलाचा मुंबई भाजपतर्फे (Mumbai BJP) निषेध करण्यात आला.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : महापालिकेतील व राज्यातील सत्ताधारी पक्षाला फायदा व्हावा यासाठी पश्चिम उपनगरांमध्ये प्रभाग सीमा बदलल्या जात आहेत. मात्र, हे आम्ही होऊ देणार नाही, असा इशारा भाजपच्या (BJP) शिष्टमंडळाने आज (ता.29 ऑक्टोबर) राज्य निवडणुक (State Election Commission Commissioner) आयुक्तांना दिला आहे.

या विषयावर मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat lodha) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्य निवडणुक आयुक्त यू.पी.एस. मदान यांची भेट घेतली. प्रभागांच्या सीमा न बदलण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. या शिष्टमंडळात आमदार अतुल भातखळकर, (Atul Bhatkhalkar) आशीष शेलार, (Ashish Shelar) अमित साटम (Amit Satam) आदींचा समावेश होता.

या प्रभागसीमा बदलाचा मुंबई भाजपतर्फे तीव्र निषेध करण्यात आला. येत्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबईतील विशेषतः पश्चिम उपनगरातील प्रभाग परिसीमा बदलल्या जात आहेत. विशेषतः सत्ताधारी पक्षाला फायदा व्हावा यासाठी हा प्रकार करण्यात येत असल्याचे लोढा यांनी यावेळी सांगितले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने 24 ऑक्टोबर रोजी दिलेल्या निवेदनात सादर केलेली परिसीमा बदलाची माहिती आणि 26 ऑक्टोबर रोजी राज्य निवडणूक आयोगाला सादर केलेले प्रभाग परिसीमा बदल यात तफावत आहे. यामुळे केवळ सत्‍ताधारी पक्षांचा फायदा होत असल्याची शंका लोढा यांनी व्यक्त केली. माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली होती. एका कॅबिनेट मंत्र्याच्या देखरेखीखाली प्रभागांच्या परिसीमेमध्ये वाटेल तसे फेरबदल केले जात असल्याची टिकाही त्यांनी केली. यावर कारवाई व्हावी आणि निदान हे बदल पारदर्शक पद्धतीने व्हावेत, असेही त्यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT