MNS Thane President Avinash Jadhav meets NCP leader Jitendra Awhad at his residence — sparks new political discussions within the Maha Vikas Aghadi allianc sarkarnama
मुंबई

MVA Politics : महाविकास आघाडीत मनसेची एन्ट्री? शरद पवारांच्या पक्षाच्या मोठ्या नेत्याची घरी बैठक, नेमकं काय ठरलं!

NCP Avinash Jadhav Jitendra Awhad : महाविकास आघाडीत मनसे देखील येणार असल्याच्या चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला मनसा मोठा नेता उपस्थित होता.

Roshan More

Thane Politics : आगामी महापालिका निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांची युती होणार, हे निश्चित मानले जात आहे. ठाकरे बंधू एकत्र येत असताना महाविकास आघाडीचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मनसे महाविकास आघाडीत येणार का? याबाबत देखील तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, ठाणे शहरात महाविकास आघाडीत मनसे येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील निवास्थानी एक बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार राजन विचारे आणि मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव उपस्थित होते.

अविनाश जाधव यांच्या उपस्थितीमुळे ठाणे शहरात महायुतीविरोधात मनसे महाविकास आघाडीत येणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. या बैठकीमध्ये महाविका आघाडीत मनसेच्या प्रवेशाबाबत चर्चा झाली की नाही याबाबत खात्रीशीर माहिती नाही. मात्र, ठाणे शहराच्या समस्येबाबत सर्व पक्षांनी एकत्र मिळून आंदोलन करण्याचे ठरवण्यात आल्याची माहिती आहे.

ठाणे शहरात वाहतूक कोंडी, पाण्याची समस्या तीव्र आहे. त्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे मिळून मोर्चा काढणार असल्याची माहिती आहे. या मोर्चातून सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरण निर्माण केले जाणार आहे.

महापालिका निवडणुकीत युती?

ठाणे महापालिकेत एकनाथ शिंदे आणि भाजप युतीची ताकद जास्त आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र लढणे महत्त्वाचे आहे. त्यात ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेने महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही? याबाबत शंका उपस्थित केली जात होती. मात्र, आव्हाडांच्या घरी आयोजित बैठकीला मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव उपस्थित राहिल्याने महापालिका निवडणुकीत ठाणे शहरासाठी मनसे महाविकास आघाडीसोबत येईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे ठाणे महापालिका निवडणुकीत वेगळे चित्र दिसण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT