Bapu Pathare : मोठी बातमी! शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की, बापू पठारे-बंडू खांदवेंमध्ये राडा! अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'वर

Bapu Pathare Vs Bandu Khandve NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे यांना एका कार्यक्रमात धक्काबुक्की झाली. त्यामुळे लोहगाव परिसरात तणावाचे वातावरण होते.
Bapu Pathare Sharad pawar
Bapu Pathare Sharad pawarsarkarnama
Published on
Updated on

Pune News : वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे यांना लोहगाव परिसरात झालेल्या कार्यक्रमादरम्यान धक्काबुक्की झाली. ही धक्काबुक्की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे बंडू खांदवे यांच्यासोबत झालेल्या वादानंतर झाल्याची माहिती आहे.

लोहगाव येथे शनिवारी संध्याकाळी एका स्थानिक कार्यक्रमादरम्यान आमदार पठारे आणि बंडू खांदवे शाब्दिक वाद झाला. वाद चिघळताच दोन्ही बाजूंमध्ये मारामारी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा सर्व वाद रस्त्याच्या कामाच्या वरून झाला असल्याचे सांगितले जात आहे.

प्रशासनाकडून लोहगाव परिसरातील रस्त्याचे काम काही कारणास्तव थांबवण्यात आले होते. या विरोधात खांदवे आंदोलन करणार होते आणि यावरूनच हा वाद झाल्याचा सांगितलं जात आहे.

लोहगाव वाघोली रोडवरील गाथा लॅान्स येथे एका माजी सैनिकांच्या सत्काराचा नियोजित कार्यक्रम होता त्यासाठी बापूसाहेब पठारे तिथे कार्यक्रमाला येत होते. त्याच कार्यक्रमातून लोहगाव ग्रामपंचायतचे माजी सभापती बंडू खांदवे बाहेर येत असताना आमदार पठारे यांची एन्ट्री झाली. तेथे दोघांमध्ये शाब्दिक वाद पेटला त्यानंतर झटापट झाली. आमदार पठारे यांना धक्काबुक्की करण्यात आली. पठारेंच्या समर्थकांना ही माहिती कळताच त्यांचे समर्थक तसेच खांदवेंचे समर्थक देखील तेथे आले. त्यामुळे परिसरात तणाव वाढला होता.

उपमुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

वातावरण चिघळू नये म्हणून उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना परिस्थिती हाताळण्यासाठी फोनवरून आदेश दिले. काहीच वेळात गाथा लॅान्सला छावणीचे स्वरूप आले. रात्री उशीरापर्यंत विमानतळ पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती..

आमदार बापू पठारे काय म्हणाले?

08 डिसेंबर 2023 रोजी रोडला 31 कोटी रुपये मंजूर झाले होते तर 2024 पर्यंत कोणी अडवले होते. जर आपल्याला रोड करण्यासाठी ज्ञान प्राप्त असतं तर आपण समजून घेतले असते परंतु राजकारण म्हणून आंदोलन करणं हे तुम्हाला शोभत का? त्या रस्त्यावर पाण्याच्या लाईन नव्हत्या, ड्रेनेजच्या लाईन नव्हत्या. नागरिकांनी त्या जोडल्या नव्हत्या तर रस्ते करायचे कसे होते मग राजकारण म्हणून जन आक्रोश आंदोलन करायचे का? मग 5 वर्षांमध्ये सत्तेमध्ये होते तेव्हा आर पी रस्ते, डीपी रस्ते का केले नाही कुणी अडवले होते. आपण मग आता चुकीची यादी दाखवून लोकांना फसवण्याचे काम करता का? असा माझा सवाल आहे. समोर येऊन बोला माझ्याबरोबर खोटं राजकारण करू नका. जनता माफ करणार नाही, असे आमदार बापू पठारे म्हणाले.

बंडू खांदवे काय म्हणाले?

बंडू शहाजी खांदवे म्हणाले, आमचे आंदोलन हे प्रशासनाविरूद्ध होते परंतू आमदारांनी हा विषय स्वत:वर ओढावून शाब्दिक वाद घातला. वेळ पडली तर आम्ही गाव विकत घेऊ अशी धमकी दिली. झटापटीमध्ये आमदारांच्या तीन ते चार सुरक्षारक्षकांनी माझे शर्ट फाडले आणि मलाही मारहाण केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com