Nagpur Audi Car Hit and Run Case Sarkarnama
मुंबई

Sanket Bawankule: लाहोरी बारमधील 'बीफ' राऊतांना 1हजार 1कोटींना पडणार?

Mangesh Mahale

Nagpur Audi Car Hit and Run Case: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुपुत्र संकेत यांचा सहभाग असलेल्या नागपुरातील ऑडी कार हिट अँड रन अपघातानंतर (Nagpur Audi Car Hit and Run Case) लाहोरी रेस्टॉरंट (lahori bar) चर्चेत आले आहे.

बुधवारी (काल) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी लाहोरी रेस्टॉरंट आणि बारमध्ये संकेत बावनकुळे आणि त्याच्या मित्रांनी बीफ कटलेट खाल्ल्याचा खळबळजनक आरोप केला होता. 'लाहोरी'चे मालक समीर शर्मा (Sameer Sharma) यांनी राऊतांचे आरोप फेटाळले आहेत. राऊतांना शर्मांनी फटकारलं आहे.

"राऊत, तुमच्या राजकारणाच्या नादात एखाद्याचा व्यवसाय बुडवायला निघताना तुम्हाला लाज कशी नाही वाटत ? माफी मागा," अशा शब्दात समीर शर्मा यांनी संताप व्यक्त केला आहे. "गेली 45 वर्ष आम्ही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहोत आणि इतक्या वर्षात आम्ही कधीच "बीफ" सर्व्ह करण्याची कल्पना देखील केली नाही," असे स्पष्टीकरण शर्मा यांनी दिले आहे.

काल लाहोरी बारचे मालक समीर शर्मा हे सीताबर्डी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. संजय राऊत यांचा आरोप खोटा आहे, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

समीर शर्मा यांनी काल पोलीस ठाण्यात जाऊन राऊतांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. राऊतांविरोधात 1 हजार 1 कोटींचा मानहानीचा दावा आपण कोर्टात दाखल करणार असल्याचंही समीर शर्मा म्हणाले.

आमच्या रेस्टॉरंटमध्ये घटनेच्या रात्री चार तरुण आले होते. त्यांनी खाण्याची कुठलीही वस्तूंची कुठलीही ऑर्डर दिली नाही. त्यांनी दारू आणि कोल्ड्रिंक मागितली. ती त्यांना दिली. पंधरा मिनिट थांबून ते तरुण निघून गेले. त्यांनी कुठलेही खाण्याच्या वस्तूचे ऑर्डर दिलीच नाही, त्यामुळे बीफ कटलेटचा प्रश्न आलाच कुठून, असा सवाल शर्मांनी राऊतांच्या आरोपानंतर उपस्थित केला आहे.

लाहोरी बारमध्ये जे बिल आहे ते लोकांसमोर आले पाहिजे. त्या बिलामध्ये दारूचा उल्लेख आहे. सोबतच त्यात चिकन, मटण आणि बीफ कटलेटचा अर्थात गोमांस याचा देखील त्यात समावेश आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT