Nagpur Violence sarkarnama
मुंबई

Nagpur Violence: नागपूर हिंसाचारातील फहीम खान याचे लखनौ कनेक्शन; हिंदू नेत्याच्या हत्येशी संबंध

Faheem Khan Lucknow connection:सैय्यद असीम याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल झाले आहेत. 2019 मध्ये लखनौ येथे कमलेश तिवारी यांच्या हत्ये प्रकरणात सैय्यद अली याला पोलिसांनी अटक केली होती.

Mangesh Mahale

Nagpur News:नागपूर हिंसाचारातील प्रमुख आरोपी फहीम खान याच्या जामीनावर आज सुनावणी होणार आहे. त्याला जेल होणार की बेल हे दुपारी समजेल . या प्रकरणात नवीन अपडेट समोर येत आहे. फहीम खान यांच्यासोबत सैय्यद असीम अली याचे नाव उघडकीस आले आहे. सैयद असीम अली हा कमलेश तिवारी हत्येतील आरोपी आहे. 2019 मध्ये लखनौ येथे तिवारी यांची हत्या झाली होती.

कमलेश तिवारी यांची हिंदू नेता म्हणून ओळख होती. सैय्यद अली याचा नागपूर हिंसांचारासाठी काय संबध आहे, या अँगलने नागपूर पोलीस आता तपास करीत आहेत . सैय्यद अली सध्या फरार असून उत्तर प्रदेश पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गेल्या 17 मार्च रोजी नागपुरात झालेल्या हिंसाचारात अनेक व्यक्ती जखमी झाले होते. समाज कंटकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. त्यामुळे परिसरात काही दिवस पोलिसांना कर्फ्यू लागला होता.

फहीम खान हा प्रकरणाताली मुख्य आरोपीचा असल्याचे पोलिसांचे मत आहे. फहीम हा माइनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा नेता आहे. जमावाला भडकविण्याचा त्याच्यावर आरोप आहे. तपासात नागपूर पोलिसांच्या हाती काही पुरावे लागले आहेत. यात सैय्यद असीम अली याचे नाव समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेनुसार सैयद असीम अली हिंसाचारापूर्वी काही दिवस अशा घटनांमध्ये सक्रिय होता. त्यानंतर तो फरार झाला आहे. पोलिस त्याचा मागावर आहे.

सैय्यद असीम याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल झाले आहेत. 2019 मध्ये लखनौ येथे कमलेश तिवारी यांच्या हत्ये प्रकरणात सैय्यद अली याला पोलिसांनी अटक केली होती. तिवारी हत्या प्रकरणातील आरोपींच्या तो संपर्कात होता. त्याने एक व्हिडिओ अपलोड केला होता. गेल्या वर्षी सुप्रीम कोर्टानं त्याचा जामीन मंजूर केला आहे. पण आता नागपूर हिंसाचार प्रकरणात त्यांचे नाव आल्याने नागपूर पोलीस त्यांचा गांभीर्याने तपास करीत आहे.

नागपूर हिंसाचाराशी सैय्यद असीम यांचे कनेक्शन असल्याचे पुरावे मिळाले असल्याचे नागपूरचे पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंघल यांनी सांगितले. या प्रकरणात आतापर्यंत शंभहून अधिक जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यात फहीम खान याचाही समावेश आहे. त्याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे.

फहीम खान याला 11 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या जामीनावर आज सुनावणी होत आहे. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करताना पोलिसांना कधीही पोलीस कोठडी घेण्याचा अधिकार राखीव ठेवण्यात आला आहे. अन्य पोलिस ठाण्याचे पोलिस चौकशीसाठी त्याचा ताबा घेऊ शकतात, असे न्यायालयाने म्हटलं आहे.

SCROLL FOR NEXT