Aaditya Thackeray Sarkarnama
मुंबई

Aaditya Thackeray : "...म्हणून फोटोसेशनला आलो नाही!"; आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा

Maharashtra All Party Photo session : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सर्वपक्षीय नेत्याचं फोटोसेशन करण्यात आले.

Deepak Kulkarni

Mumbai News : नागपूरला हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधान भवन परिसरात सर्वपक्षीय आमदारांचे फोटोसेशन झालं. या फोटोसेशनला विधानसभाध्यक्ष,मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. पण फोटोसेशनला माजी मंत्री आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे उपस्थित नव्हते. याचमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. अखेर या फोटोसेशनला उपस्थित न राहण्यामागचं कारण समोर आले आहे.ठाकरेंनीच फोटोसेशनला उपस्थित न राहण्याबाबत मोठा खुलासा केला आहे.

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सर्वपक्षीय नेत्याचं फोटोसेशन करण्यात आले. फोटोसेशनला विधानसभाध्यक्ष, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. विधिमंडळांच्या पायऱ्यांवर गुरुवारी आंदोलनाऐवजी सर्वपक्षीय आमदारांचे फोटोसेशन करण्यात आलं आहे.या फोटोसेशनची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली.

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यात त्यांनी हिवाळी अधिवेशनात विधानभवन परिसरात सर्वपक्षीय आमदारांचे फोटोसेशन झालं.पण या फोटोसेशन अगोदरच आदित्य ठाकरे तिथून निघून गेले. यावर त्यांनी मोठा खुलासा केला आहे.

ठाकरे म्हणाले, फोटोसेशनला पहिल्या रांगेत सगळे घटनाबाह्य मंत्री होते,कुठे उभं राहायचं म्हणून मी आलो नाही, तर माझं मुळात मन नव्हतं. म्हणून मी आजच्या फोटोशेनला आलो नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले. (Nagpur Winter Session)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरे नेमकं काय म्हणाले...?

आदित्य ठाकरे शिंदे-फडणवीस -पवार सरकारवर (Shinde - Fadnavis- Pawar) टीकेची झोड उठवली. ते म्हणाले,फोटोसेशनमध्ये सहभागी व्हायला माझं मन नव्हतं. मी आधीच्या फोटोसेशनमध्ये सहभागी झालो होतो. पण येथे घटनाबाह्य सरकार निर्माण झालं आहे, त्या सरकारमध्ये फोटोसेशन करण्याचं माझं मन नव्हतं. समोरच्या रांगेत सगळे घटनाबाह्य सरकार मधील मंत्री होते. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना मी मागच्या रांगेत उभा होतो. कुठे उभं राहायचं म्हणून मी आलो नाही,तर माझं मुळात मन नव्हतं म्हणून मी आजच्या फोटोशेनला आलो नाही असं स्पष्ट मत ठाकरेंनी सांगितले.

हे सरकार निवडणुकीला घाबरतंय...

राज्यातील सरकारने महाराष्ट्रामध्ये लोकतंत्र मोडीत काढलं आहे.चंद्रपूर, पुणे लोकसभा पोटनिवडणुका झाल्या नाहीत.सिनेटची निवडणूक घेत नाही. इलेक्शन कमिशन निवडणूक घ्यायला तयार नाही. कुठलीच निवडणूक घ्यायला सरकार आणि निवडणूक आयोग तयार दिसत नाही.हे सरकार निवडणुकीला घाबरतंय असा हल्लाबोलही आदित्य ठाकरेंनी केली.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT