Loksabha Election : पुणे लोकसभेची पोटनिवडणूक झाल्यास बसणार 'या' मतदारांना फटका

Political News: येत्या काळात जवळपास ३० हजार पुणेकर मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
 Pune By-Election
Pune By-ElectionSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election News: देशभरात नव्या वर्षाच्या सुरुवातीला सार्वत्रिक लोकसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाकडून सुरू आहे. त्यानुसार मतदारयादी अद्ययावतीकरणाचा कार्यक्रमही हाती घेतला आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी पोटनिवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत.

भारत निवडणूक आयोगाने ५ जानेवारी २०२४ या तारखेच्या आधी निवडणूक जाहीर केल्यास ३० हजार मतदारांना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे येत्या काळात जवळपास ३० हजार पुणेकर मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

 Pune By-Election
Kolhapur BJP News : भारत संकल्प यात्रेवरून तुफान राडा; भाजप-डाव्या आघाडीचे कार्यकर्ते भिडले

पुणे लोकसभा पोटनिवडणूक  (Pune Lok Sabha By-Election)  जाहीर करावी लागल्यास नेमकी कोणती मतदारयादी वापरायची, याचा निर्णय प्रशासनाला येत्या काळात घ्यावा लागणार आहे. नवीन मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. या पूर्वी या कार्यक्रमानुसार ५ जानेवारी २०२३ रोजी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील मतदारांची मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

३० हजार मतदार राहणार मतदानापासून वंचित

त्यासोबतच ५ जानेवारी २०२४ ला लोकसभा निवडणुकीत वापरण्यात येणारी मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच पुणे लोकसभा पोटनिवडणूक जाहीर झाल्यास ५ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली मतदारयादी वापरण्यात येईल. परिणामी पुणे लोकसभा मतदारसंघातील नव्याने मतदार झालेल्या सुमारे ३० हजार मतदारांना मतदानापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

२७ हजार ५० मतदारांची पडणार भर

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील मिळून एकूण २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदारयादी २८ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली. या यादीनुसार या सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये २७ हजार ५० मतदार नव्याने मतदार समाविष्ट झाले आहेत.

प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर एक लाखांपेक्षा जास्त मतदार नोंदणीचे अर्ज जिल्हा निवडणूक शाखेला प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातील नव्या मतदारांचेही अर्ज आहेत. त्यामुळे २७ हजार ५० मतदारांमध्ये आणखी नव्या मतदारांची भर पडणार आहे.

(Edited by Sachin Waghmare)

 Pune By-Election
Pune LokSabha Election : पुणे लोकसभेबाबत मोठी अपडेट ; न्यायालयाच्या निर्णयाविरोधात निवडणूक आयोगाने उचलणार 'हे' पाऊल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com