Najib Mullah  Sarkarnama
मुंबई

Thane Politics : ठाण्यात भाजपला गुगली; मुख्यमंत्री शिंदे, अजितदादांचे बॅनर...

Najib Mullah Trophy 2024 : देवेंद्र फडणवीस यांचे कुठेही बॅनर दिसत नाही.

सरकारनामा ब्यूरो

पंकज रोडेकर

Thane: ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये टेनिस क्रिकेट स्पर्धेचे धुमशान सुरू आहे. नजीब मुल्ला ट्रॉफी २०२४ या स्पर्धेदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेले नजीब मुल्ला यांनी भाजपला चक्क गुगलीच टाकल्याचे काम केले आहे.

९ ते २१ जानेवारी दरम्यान चालणाऱ्या या स्पर्धेचे ब्रॅण्डिंग ही मुल्ला यांनी तितक्याच दणक्यात केलेले आहे. तसेच स्टेडिअम बाहेर आणि स्टेडिअम च्या आतामध्ये ही त्यांनी राजकीय नेत्यांचे मोठमोठे बॅनर लावले आहेत.

प्रामुख्याने प्रवेशद्वारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो झळकताना दिसत आहे. पण, भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुठेही बॅनर दिसत नाही. अशाप्रकारे या स्पर्धेच्या निमित्ताने भाजपला गुगली मारा करीत, राष्ट्रवादीने अजित पवार यांना आता मुख्यमंत्री करा, असे म्हणायचे आहे, असे यातून दिसते.

क्रिकेटपटूंसाठी दरवर्षी सेंट्रल मैदानात नजीब मुल्ला यांच्या वतीने क्रिकेट सामने खेळवले जायचं. मात्र यंदा हेच क्रिकेट सामने दादोजी कोंडदेव स्टेडिअम मध्ये मोठ्या स्वरूपात आयोजित केले गेले आहे. त्यामुळे निश्चित टेनिस क्रिकेटला एका उंचीवर नेण्याचे काम ठाण्यातून होताना दिसत. नजीब मुल्ला ट्रॉफी २०२४ ही स्पर्धा लेदर बॉलच्या धर्तीवर टेनिस बॉलने खेळविण्यात येत आहे.

शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी फुटून दोन गट झाले. त्यावेळी अजित पवार यांच्यासह ९ जणांनी महायुतीत प्रवेश केला. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित दादांना भाजपकडून मुख्यमंत्री केले जाईल असे म्हटले गेले. मात्र अद्यापही त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलेले नाही. त्यातच आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, अशी प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा असते.

त्याच अपेक्षेतून अजित पवार गटाचे सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी राष्ट्रवादीचे नेतेमंडळी आणि मुख्यमंत्री आणि त्यांचे सुपुत्र खासदार यांचे बॅनर लावले आहेत. मात्र भाजपच्या एकाही नेत्याचे बॅनर लावले नाही. अशाप्रकारे मुल्लांनी गुगली मारा करत, भाजपला अजित पवार यांना मुख्यमंत्री करा असा राहून राहून सांगण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

टेंभीनाक्यावर गोपालकाला होते फोटो

टेंभीनाक्यावर गोपाळ काला उत्सवात इतर पक्षाच्या नेत्याचा फोटो लागला नव्हता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून टेंभीनाक्यावर मोदी-शाह आणि फडणवीस यांचे फोटो लावले जात आहेत. तर भाजप,शिंदे आणि अजित पवार गटाची महायुती झाल्याने तिन्ही पक्षांच्या कार्यक्रमांना मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचे हमखास फोटो पाहण्यास मिळतात. मात्र यंदा राष्ट्रवादी अजित दादा गटाने भाजपला मुद्दामच लांब ठेवल्याचे बोलले जात आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT