Ujjwal Nikam: नार्वेकरांच्या निकालानंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया; निर्णय केवळ पक्षप्रमुखच घेऊ शकत नाहीत, तर...

MLA Disqualification Case: दोन्ही गटांचे आमदार पात्र
Ujwal Nikam
Ujwal NikamSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : 'शिवसेना हा विधिमंडळात अधिकृत पक्ष आहे,' असे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकालपत्रात सांगितलं आहे. यावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नार्वेकरांच्या निकालावर स्पष्टीकरण दिले आहे.

निकम म्हणाले, "नार्वेकरांनी दिलेल्या निकालात नवीन बाब समोर आली आहे. त्यात पक्षाच्या घटनेत संघटनास्थापनेपासून राष्ट्रीय कार्यकारिणीला अधिकार असल्याचं समोर आलं आहे. एखादा निर्णय केवळ पक्षाचा प्रमुखच घेऊ शकत नाही, तर राष्ट्रीय कार्यकारिणीला अधिकार असल्याचं नार्वेकरांनी म्हटलं आहे. पक्षफुटीनंतर रेकोर्डवर एकनाथ शिंदे यांना जास्त आमदारांचा पाठिंबा आसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे गटाचा असल्याचं आतापर्यंतच्या निकालावरून स्पष्ट होत आहे."

Ujwal Nikam
Rahul Narvekar Final Decision : 20 जून 2022 ते 10 जानेवारी 2024; जाणून घ्या अपात्रता प्रकरणाचा प्रवास

शिवसेना आमदार अपात्रतेवर महानिकाल आज लागला. यात शिंदे गटाचे 16 आमदार पात्र ठरले, तर शिंदेंचीच शिवसेना खरी, असा निकाल नार्वेकरांनी दिला. भरत गोगावलेंची प्रतोदपदी नियुक्ती वैध असल्याचे नार्वेकरांनी सांगितले. शिंदेंच्या आमदारांनी पक्षाच्याविरोधात कारवाया केलेल्या नाहीत, असे मत नार्वेकरांनी व्यक्त केले. या निकालाच्याविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल आज लागला. शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचा निकाल नार्वेकरांनी दिला. दोन्ही गटांचे आमदार पात्र असल्याचा निकाल त्यांनी दिला.

  • राष्ट्रीय कार्यकारिणीला गटनेतेपदाचा निर्णय घेण्याचा अधिकार

  • 2018 ची पदरचना शिवसेनेच्या घटनेनुसार नव्हती

  • उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय कार्यकारिणीचा पाठिंबा नव्हता

  • शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी ही सर्वोच्च

  • खरी शिवसेना कोणाची, हे ठरवण्याचा अधिकार मलाच

  • पक्षप्रमुख हे एकटेच निर्णय घेऊ शकत नाहीत

  • भरत गोगावले हेच शिवसेनेचे अधिकृत प्रतोद

  • एकनाथ शिंदेंची नेतेपदावरून हकालपट्टी अमान्य

  • शिवसेनेची 1999 ची घटना ग्राह्य धरली जाणार

  • 2018 मधील शिवसेनेच्या घटनेवर नार्वेकरांचा आक्षेप

  • R...

Ujwal Nikam
Sanjay Gaikwad : ठाकरेंना कळलंय, आपला 'निकाल' लागलाय : गायकवाडांनी देशमुखांना खडसावले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com