Nana Patole, Rahul Gandhi sarkarnama
मुंबई

कॉग्रेसमध्ये मोठा बदल; पटोलेंच्या निर्णयाला पक्षश्रेष्ठींकडून स्थगिती

पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर नाना पटोले यांनी सर्व जिल्हाध्यक्ष यांना याबाबत पत्र पाठवले आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांच्या जिल्हा कार्याध्यक्ष नियुक्त्यांचा निर्णयाला पक्षश्रेष्ठींनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे सर्व जिल्हा कार्याध्यक्ष यांच्या नियुक्त्या स्थगित करण्यात आल्या आहेत.

पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर नाना पटोले यांनी सर्व जिल्हाध्यक्ष यांना याबाबत पत्र पाठवले आहे. ''महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीने (Congress) यापूर्वी जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी नेमलेल्या सर्व कार्याध्यक्षांना यापुढे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून संबोधण्यात यावे,'' असे नाना पटोले यांनी काढलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये बदलाचे संकेत देण्यात आले आहेत. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारमध्ये बदल होणार आहेत, असे सांगत राजकीय भूकंपाचे संकेत दिले आहेत. 10 मार्चनंतर सरकारमध्ये बदल होतील, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे.

काही दिवसापूर्वी नाना पटोले यांनी भंडारा येथे एका जाहीर सभा कार्यक्रमात राजकीय भूकंपाचे संकेत दिले आहेत. पाच राज्याच्या निवडणुका झाल्यानंतर 10 मार्चनंतर बदल होणार आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. ही वेळ दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे 10 मार्चनंतर नक्की काय बदल होणार याची उत्सुकता आहे. राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

लवकरच राज्य सरकारमध्ये बदल दिसतील. सध्या राज्यात जे काही सगळे सुरु आहे, ते लवकरच दुरुस्त करायचे आहे, असे नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राज्याच्या मंत्रिमंडळात खांदेपालट होणार याचे संकेत त्यांनी दिले आहेत. येत्या 10 मार्चला पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील जवळपास 13 पालिकांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

''राज्य सरकारमध्ये सध्या जे काही सुरू आहे, ते ठीक नाही. याबद्दल सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी माझे बोलणे झालेले आहे. १० मार्च रोजी ५ राज्यांतील निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यानंतर सरकार दुरूस्त करणार असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT