राऊतांचे नवं टि्वट ; चिराग हवा के खिलाफ क्यों जलता है..

आज राऊतांनी दुसरं टि्वट केलं आहे. त्याच्या या टि्वटची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. संजय राऊतांचं नवं ट्विट चर्चेत आलं आहे.
 Sanjay Raut
Sanjay Raut sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यामध्ये आता महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये चिखलफेक सुरू झाली आहे. शिवसेना भवनात (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर आरोपांच्या फैरी झडत आहेत.

भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)आणि राऊत यांच्यातील वाद रंगला आहे. दोन दिवसापासून राऊत रोज टि्वट करीत आहेत. त्यांच्या सूचक टि्वटमुळे अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

बुधवारी संजय राऊत यांनी 'बाप बेटे जेल मधे जाणार,' असं सूचक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आज राऊतांनी दुसरं टि्वट केलं आहे. त्याच्या या टि्वटची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. संजय राऊतांचं नवं ट्विट चर्चेत आलं आहे. आपला एक खास फोटो शेअर केला आहे. राऊतांनी याअगोदर अनेकदा अशा पद्धतीने ट्विट केले आहे. राऊत विरूद्ध सोमय्या वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

मंगळवारी संजय राऊत यांनी किरीट सोमय्या व त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर ‘बाप बेटे जेल मधे जाणार’, असं सूचक वक्तव्य केलं होतं. आज त्यांनी 'मेरा यही अंदाज ज़माने को खलता है, कि चिराग हवा के खिलाफ क्यों जलता है,' असं टि्वट केलं आहे.

राऊतांच्या या टि्वटवर नेटकऱ्यांची उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत. या पत्रकार परिषदेत राऊतांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात २५ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. या गैरव्यवहारात अमोल काळे (Amol Kale) आणि विजय ढवंगाळे हे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप राऊत (Sanjay Raut)यांनी केला.

 Sanjay Raut
दहशतवादी यासिन भटकळच्या पुण्यातील तत्कालीन वकीलाला 'इसिस'कडून धमकी

संजय राऊतांनी केलेल्या आरोपानंतर अमोल काळे आणि विजय ढवंगाळे हे कोण याबाबत चर्चा रंगली आहे. कॉग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी टि्वट करुन अमोल काळे यांच्याबाबत भाष्य केलं आहे. यात त्यांनी राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर अमोल काळे कुठे आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

संजय राऊत साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन उघड केलेल्या घोटाळ्यातील एक घोटाळेबाज लंडनला पळून गेल्याची माहिती मिळतेय. तो घोटाळेबाज अमोल काळे तर नाही ना ? कुठे आहे अमोल काळे?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com