Congress State President Nana Patole on OBC Reservation Latest News
Congress State President Nana Patole on OBC Reservation Latest News Sarkarnama
मुंबई

OBC Reservation : नाना पटोले आक्रमक ; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागितली दाद

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकावं, यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून प्रयत्न सुरु आहे. पण राज्य सरकारला अद्याप त्यामध्ये यश मिळताना दिसत नाही. राज्यात दोन महिन्यांपूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत ओबीसींना राजकीय (obc reservation) आरक्षण मिळालं नाही. त्यामुळे ओबीसी समाजातील नेते आक्रमक झाले आहेत. (OBC Reservation Latest News)

राज्यभरात ओबीसी आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागातर्फे देण्यात आला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना पत्र लिहून दाद मागितली आहे.

"ओबीसी आरक्षणाला 2017 पासून महाराष्ट्रात ग्रहण लागलेले आहे. ते आजही संपलेले नाही. मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील ओबीसींना आरक्षण मिळावे आणि आता होणाऱ्या निवडणुका ओबीसी आरक्षणाने व्हायला हव्यात.यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे," असे पटोले म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दोन महिन्यांपूर्वीच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालं नाही. ओबीसींचा राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आजही तोडगा निघालेला नाही. ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकावं यासाठी राज्य सरकारकडून प्रचंड प्रयत्नही सुरु आहेत. पण राज्य सरकारला त्यामध्ये हवं तसं यश मिळताना दिसत नाही.

"ओबीसी समाजावर राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात अन्याय होत आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात बहुजनांवर अन्याय होणे योग्य नाही," असे पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT