Nana Patole On Ashok Chavan Sarkarnama
मुंबई

Nana Patole On Ashok Chavan : 'भाजपवासी' चव्हाणांना पहिला धक्का देण्यासाठी काँग्रेसने उचललं मोठं पाऊल; पटोलेंनी दिले संकेत..

Ashok Chavan In Bjp : नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला, कुठल्याही व्यक्तीचा नाही...

Chetan Zadpe

Mumbai News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुंबईतील भाजप कार्यालायत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपवासी होताना चव्हाण म्हणाले, "राजकीय आयुष्याची एक नवीन सुरुवात करत आहे. मागील 38 वर्षांच्या राजकीय प्रवासात हा बदल करत आहे, असे भाजप प्रवेशानंतर अशोक चव्हाण म्हणाले. दरम्यान यानंतर आता काँग्रेसकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नान पटोले यांनी चव्हाणांवर सडकून टीका केली आहे. (Nana Patole On Ashok Chavan)

नाना पटोले यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेत अशोक चव्हाणांवर हल्लाबोल केला "पंधरा तारखेला आमच्या पक्षाची मिटींग आहे. त्या दिवशी सकाळी साडे नऊ वाजता आम्ही सोबत राहणार आहोत. 16 आणि 17 तारखेला आमचं लोणावळ्याला शिबिर ठरले आहे. या शिबिरीलाही सर्व आमदार एकत्र राहतील. या अफवांना आपण सर्वांनी पूर्णविराम द्यावं. "

"नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. कुठल्या व्यक्तिविशेषचा नाही. त्यामुळे तिथे काँग्रेसचाच खासदाराल निवडून येईल. आता आमच्याकडे सर्व नांदेडची लोकं आली आहेत. आता या ठिकाणी उमेदवारही आमच्याकडे आहे. आमच्याकडे उमेदवारांची कमी नाही. अनेक भाजपचे आणि आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत," असा दावा पटोले यांनी केला आहे. (Latest Political News)

काँग्रेस प्रभारींची सडकून टीका -

काँग्रेसचे प्रभारी चेन्नथला यांनी चव्हाणांसह भाजपला धारेवर धरले. ते म्हणाले, "चव्हाण विविध बैठकांत आमच्यासोबत होते. पक्षात त्यांना कुठलाही त्रास नव्हता. पक्षाने त्यांच्यासाठी काय नाही केले. त्यांच्यावर ईडी, सीबीआयचा दबाव होता का? आता ते काहीही न सांगता असे जाऊ शकत नाही. त्यांना जाण्याचे कारण स्पष्ट करावे लागेल," असा आव्हानच चव्हाणांना केले. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"जे लोक चाललेत त्यांना जाऊ द्या. त्यांच्या प्रति कुणालाही सहानुभूती नाही. राजकारणात अशा प्रकारे आयाराम - गयारामांना काहीही स्थान नसते. नेते गेले तरी जनता महाविकास आघाडीसोबत आहे. आम्ही सर्वजण एकदिलाने काम करू, राज्यात आम्ही ताकदीने लढू. ज्यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप आहेत. त्यांच्यासाठी भाजपचे दारवाजे सताड खुले आहेत. अजित पवार हे त्याचे एक चांगले उदाहरण आहे," असा टोलाही भाजपला चेन्नीथलांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT