Sharad Pawar Group NCP : शरद पवार गटाचा कवितेतून भाजपला टोला; म्हणाले, 'शेंबडं पोर...'

Allegation that BJP has created fear of ED : भाजपने ईडीची भीती घालत अनेक नेत्यांना आपल्या जाळ्यात ओढल्याचा आरोप
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Mumbai News : राज्यात सध्या राजकीय गणितं बदलली आहेत. काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा 'हात' सोडला आणि लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, या सगळ्यात आता शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाने भाजपवर निशाणा साधत कवितेतून टोला मारला आहे.

महाविकास आघाडीमधील बहुतांश नेते भाजपच्या वाटेवर जाणार असल्याची चर्चा आहे. भाजपने ईडीची भीती घालत अनेक नेत्यांना आपल्या जाळ्यात ओढल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सची भीती दाखवत त्यांनी ऑपरेशन लोटस पूर्ण करायचं ठरवलं असल्याचं सांगितलं जात आहे.

Sharad Pawar
Sanjay Raut: चव्हाणांनी स्वत:चे बारा वाजवून घेतले, शिंदे भाजपसोबत गेले तेव्हाच ते काँग्रेस सोडणार होते...

मात्र, लहानपणीची एक कविता शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला आठवली आहे. जॉनी.. जॉनी.. या कवितेतील जॉनी नेमका कोण आहे, हे एखादं शेंबडं पोरदेखील सांगेल, असा मिश्किल टोला त्यांनी लगावला आहे. खोके, ईडी, पार्टी सोडण्याची मालिका, खोटं बोलून तोंड उघडल्यावर बोलायला सांगितल्यास भाजपचं नाव पुढे येतं, असा टोला त्यांनी लगावला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात आणि देशात सध्या ईडीची भीती घातली जात आहे. नेत्यांना आणि मंत्र्यांना ईडीची भीती घालून त्यांना मूळ पक्षाची साथ सोडायला लावणं, हे भाजपचं सत्र सुरू असल्याचा आरोप विरोधक भाजपवर करत आहेत. त्यामुळे येत्या काळात अजून किती नेते जाणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे.

काँग्रेसमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर ?

काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात अनेक काँग्रेस पक्षातील नेते आहेत. स्वतः विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारदेखील आहेत. त्यांच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. याची वारंवार तक्रार दिल्लीलादेखील केली आहे.

मात्र, कोणतीही दखल न घेतल्याने पक्षातील नेते वैतागले आहेत. हाच वाद आता उघड झाला आहे. आधी मिलिंद देवरा, नंतर बाबा सिद्दिकी आणि आता अशोक चव्हाण. चव्हाण यांच्या सोबत अनेक काँग्रेसचे आमदारदेखील हातात कमळ घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आता तरी काँग्रेस ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात सुधारणा करणार की गळती कायम राहणार हे महत्त्वाचं आहे.र

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर सोमवारी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या गटामध्ये प्रचंड खळबळ उडाली. महाराष्ट्रातील बदलत असलेली राजकीय परिस्थिती तसेच राज्यातील राज्यसभेच्या उमेदवारीसंदर्भात पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक झाली.

नव्या राजकीय परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या दोन्ही घटक पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीवर निर्णय घेण्यासाठी खर्गेंच्या निवासस्थानी केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली.

(Edited by Amol Sutar)

R

Sharad Pawar
Dharashiv Loksabha Constituency : धाराशिव लोकसभेच्या उमेदवारीचा घोळ मिटेना ; शिंदे - पवार गटात रस्सीखेच...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com