Narayan Rane  sarkarnama
मुंबई

भाजपच्या विजयाचं श्रेय नारायण राणेंनी दिलं दोन व्यक्तींनाच!

देशातील पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकांचे (Assembly Election) निकाल जाहीर झाले आहेत.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकालात भाजपने (BJP) बाजी मारताच त्याचे परिणाम महाराष्ट्रातील राजकारणावर होणार असल्याचे बोलले जात आहे. 'यूपी तो झाँकी हे महाराष्ट्र बाकी है' असे भाजपच्या वतीने सांगण्यात येत आहे. भाजपने चार राज्यांत मिळवलेल्या विजयावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

राणे म्हणाले की, पाचपैकी चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या सुशासनावर जनतेने विश्वास दाखवला आहे. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या मूलमंत्राद्वारे भाजपने केलेल्या विकासकामांवर जनतेने मोहर लावली आहे. पंतप्रधान मोदी, पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे अभिनंदन करतो. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे भाजपला हे यश मिळाले आहे.

या मोठ्या विजयाबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह चारही राज्यांचे मुख्यमंत्री, पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो. या सर्व राज्यांत जनतेने भाजपवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचेही आभार मानतो, असे राणे यांनी म्हटले आहे.

पाच राज्यांतील विधानसभा निकालावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी 11 तारखेला बघा, असे सूचक वक्तव्य केले आहे. त्यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला इशाराच दिला आहे. पाटील म्हणाले, निवडणुकीचे निकाल स्पष्ट आहेत. चार राज्यात भाजपचे मुख्यमंत्री होणार आहेत. सगळ्या निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढल्या गेल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सर्वो होईल तेव्हा माहिती समोर येईल महिलांनी भाजपला मतदान केले असेल. पंतप्रधानांनी देशाचा चेहरा बद्दलला, किमान गरजा त्यांनी पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT