भाजपची वाटचाल बहुमताकडे पण मुख्यमंत्री म्हणतात, सत्तास्थापना लगेच नको रे बाबा!

मणिपूर विधानसभा निवडणुकीचे हाती येत असून, सत्ताधारी भाजपने सर्वाधिक जागांवर आघाडी घेतली आहे.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

इम्फाळ : मणिपूर विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election) हाती येत असून, सत्ताधारी भाजपने आघाडी घेतली आहे. भाजपने 60 पैकी 29 जागांवर आघाडी घेतली असून तो आता बहुमताच्या जवळ आला आहे. याचवेळी काँग्रेस आघाडीने 20 जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपने बहुमताच्या दिशेने वाटचाल केली असली तरी मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांनी मात्र, सत्ता स्थापनेसाठी आस्ते कदम भूमिका घेतली आहे.

सत्ता स्थापनेचा दावा लगेच न करण्याची भूमिका मुख्यमंत्री बिरेनसिंह यांनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकमुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ते म्हणाले की, सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागेल. पूर्ण निकाल हाती येण्याची आम्ही वाट पाहत आहोत. पक्षाचे राष्ट्रीय नेते मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेणार आहेत. सर्वंकष विकासाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रानुसार आम्ही वाटचाल करीत आहोत.

मणिपूरमध्ये (Manipur) भाजपने कोणत्याही पक्षाशी आघाडी न करता एकला चलोची भूमिका घेतली होती. याचवेळी विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने सहा पक्षांशी आघाडी केली होती. काँग्रेसप्रणित मणिपूर प्रोगेसिव्ह सेक्युलर अलायन्स या आघाडीने भाजपला जोरदार टक्कर दिली आहे. आता हाती आलेल्या निकालानुसार, भाजप हा 29 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 3 जागांवर तर काँग्रेसचे सहकारी पक्ष नॅशनल पीपल्स पार्टी 9, संयुक्त जनता दल 3 आणि नागा पीपल्स फ्रंट 4 जागांवर आघाडीवर आहेत.

BJP
काँग्रेसला सहा पक्ष सोबत घेऊन जे जमलं नाही ते एकट्या भाजपनं करुन दाखवलं

मणिपूर पक्षनिहाय जागा

भाजप -29

काँग्रेस - 3

नॅशनल पीपल्स पार्टी – 9

संयुक्त जनता दल – 3

नागा पीपल्स फ्रंट – 4

BJP
निकालादिवशीच जनतेला मिळालं गिफ्ट! पेट्रोल, डिझेल झालं स्वस्त

मुख्यमंत्री एन.बिरेनसिंह हे 18 हजार मतांनी हेनगांग मतदारसंघातून विजयी झाले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक २८ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी भाजपला २१ जागा मिळाल्या होत्या. भाजपने इतर स्थानिक पक्षांशी आघाडी करून सत्ता काबीज केली होती आणि बिरेनसिंह हे मुख्यमंत्री झाले होते. मणिपूरमध्ये (Manipur Election) दोन टप्प्यांत विधानसभा निवडणूक झाली. यातील पहिला टप्पा 28 फेब्रुवारीला तर दुसरा टप्पा 5 मार्चला झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मणिपूरमध्ये प्रचारासाठी दाखल झाले होते. त्यांनी भाजपचा जोरदार प्रचार केला होता. शहांसोबत भाजपचे बडे नेतेही मणिपूरमध्ये प्रचारासाठी मैदानात उतरले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com