Narayan Rane : Sarkarnama
मुंबई

Narayan Rane : पात्र नसतानाही शिवसेनेचा सदस्य कसा झालो; स्वत: राणेंनींच सांगितला किस्सा!

Narayan Rane : "मी वयाच्या पंधराव्या वर्षी कोकणातून मुंबईत आलो."

सरकारनामा ब्यूरो

Narayan Rane : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आणि राज्य सरकारकडून बाळासाहेबांचे तैलचित्र अनावरण सोहळा पार पडले. राज्याच्या विधिमंडळ सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्या प्रसंगी बोलताना नारायण राणे यांनी बाळासाहेबांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी बोलताना नारायण राणे यांनी बाळासाहेबांबद्दलच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी शिवसेना सदस्यत्व कसे मिळवले याचा एक भन्नाट किस्सा सांगितला. राणे म्हणाले, साहेबांना श्रद्धांजली वाहावी, हे मला पाहता यावं हे माझ्यासाठी दुर्दैवी आहे. साहेब आज हवे होते. काही लोकांना पदे मिळाली तर चांगलं बोलावं असं त्यांना वाटतं. दोन चार विशेषणं वापरावी. माझ्या आयुष्यात कोणी नव्हतं. तेव्हा बाळासाहेबांनी मला शिवसेनेत अनेक पदे मिळाली. "

"मी वयाच्या पंधराव्या वर्षी कोकणातून मुंबईत आलो. वय पंधराव्या वर्षी मी शिवसेनेकडे आकर्षित झालो. मला शिवसेनेचं सदस्य व्हायचं होतं. पण माझं वय पंधरा असल्याने मला सदस्य होता येत नव्हतं. माझ्याबरोबर एक उंच असलेला मित्र होता. मी त्याला सांगितंल की, तू जाऊन शिवसेनेचा फॉर्म भर, आणि नाव नारायण राणे सांग, अशा पद्धतीने मी शिवसेनेचं सदस्य झालो," अशी आठवण राणेंनी सांगितली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT