Narayan Rane, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Loksabha Election 2024 : बंद दाराआड चर्चेत काय घडलं? शिंदे आणि राणेंमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी 'सहकार्य करार'?

Eknath Shinde and Narayan Rane : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात सह्याद्री अतिथीगृहात चर्चा

सरकारनामा ब्यूरो

Mumbai Political News :

लोकसभा निवडणुकीला दिवसेंदिवस रंग भरू लागले आहेत. निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली नसली तरी मार्चमध्ये आचारसंहिता लागू शकते अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवार ठरवण्यावर भर दिला जात आहे.

कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघांतून केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणूक लढवतील, अशी चर्चा आहे. अशातच राणेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतल्याने अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.

नारायण राणे (Narayan Rane) राज्यसभेवर जाणार अशी चर्चा होती. अचानक अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आणि त्यांना राज्यसभेचं तिकीट मिळालं. त्यानंतर नारायण राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून (Ratnagiri Sindhudurga Loksabha Constituency) निवडणूक लढवावी लागेल, अशी चर्चा सुरू झाली.

विशेष म्हणजे शिवसेनेकडून (शिंदे) पालकमंत्री उदय सामंत यांनी अनेक वेळा या मतदारसंघावर (Loksabha Election) दावा केला आहे. त्यांच्या बंधू किरण सामंत येथून इच्छुक आहेत, तर भाजपने वर्षभरापासून या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेकडून या मतदारसंघावर दावा केला जातोय. त्यावर गेल्या आठवड्यात भाजपचे नेते मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महत्त्वाचं विधान केलं होतं. उमेदवारीच्या निर्णयावर दिल्लीतून शिक्कामोर्तब होते, असे रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी स्पष्ट केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणे, याला महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेनेने सहकार्याची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा नारायण राणेंनी व्यक्त केल्याचे समजते. कोकणात शिवसेना आणि ठाकरे गटाची चांगली ताकद आहे. शिवाय सध्या ठाकरे गटाचे विनायक राऊत खासदार आहेत. अशावेळी भाजपच्या उमेदवाराला दगाफटका होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी राणेंनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्याचे बोलले जाते.

मुख्यमंत्री शिंदे आणि केंद्रीय मंत्री राणे यांच्यात सह्याद्रीवर बंद दाराआड चर्चा झाली. सध्याची राजकीय स्थिती, त्यातच महायुतीत उमेदवारावर एकमत न झाल्यास होणारे नुकसान लक्षात घेऊन ही भेट घेतल्याची चर्चा आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT