Loksabha Election 2024 : गावबंदीच्या बॅनरवरून दीपक केसरकर संतापले; राणे समर्थक 'या' आमदारावर घसरले

Deepak Kesarkar : पर्यटनासाठी आलेल्या निधीचा खर्च न झाल्याचे खापर फोडले आदित्य ठाकरेंवर
Rajan Teli, Deepk Kesarkar
Rajan Teli, Deepk KesarkarSarkarnama
Published on
Updated on

Sindhudurga Political News :

आपण लोकसभा नाही तर विधानसभा लढवणार आहोत, असे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे काही टिल्लू पिल्लू मतदारसंघात चुकीची बॅनरबाजी करून लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करत आहेत, अशी टीका शिक्षणमंत्री आणि शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी केली आहे.

या वेळी त्यांनी माजी आमदार राजन तेली (Rajan Teli) यांचे नाव घेता टिल्लू पिल्लू असा उल्लेख केला. राजन तेली हे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) समर्थक माजी आमदार आहेत.

Rajan Teli, Deepk Kesarkar
Shivsena Politics : मंत्री दीपक केसरकरांना मतदारसंघातून चपराक; आश्वासने दिलीत, मते घेतलीत, पुढे काय?

दोन दिवसांपूर्वी दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात केसरकरविरोधी बॅनर लागले होते.

'भाई आता खराच पुरे झाला, 'थांबा आता'...पाच वर्षांत जसा आमका तोंड दाखवक नाय तसे हेच्या पुढे येव नकात आता कोपरापासून हात सोडून सांगतवं तुमका..!' अशा आशयाचा संदेश देणारे फलक सध्या म्हापण, परुळे, भोगवे परिसरात अज्ञाताकडून लावण्यात आले आहेत.

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या विरोधात काही लोकांनी लावलेले हे फलक म्हापण, परुळे, भोगवे परिसरात चर्चेचा विषय बनला होता. केसरकरांनी खूप आश्वासने दिली, पण आश्वासनांची पूर्ती केली नाही, अशी टीका या बॅनरबाजीमधून करण्यात आली होती.

यावरून दीपक केसरकर यांनी कुणाचेही थेट नाव घेता टीकास्त्र सोडलं. अशी प्रवृत्ती उद्या पदावर आल्यास नेमकं काय करतील याचा विचार जनतेनं करावा, अशी टीका दीपक केसरकर यांनी माजी आमदार राजन तेली यांचे नाव न घेता केली.

सावंतवाडी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे आलेली आहेत. चांदा ते बांदा योजनेच्या माध्यमातून अनेक विकासकामे केली. आजही चांदा ते बांदा योजनेचे काही पैसे पडून आहेत तेही लवकरच खर्च केले जातील, अशी माहिती केसरकरांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आदित्य ठाकरेंवर खापर

मुळात पर्यटनासाठी या ठिकाणी आणलेले पैसे खर्च झाले नाहीत. याला पर्यटन खात्याला यापूर्वी लाभलेले अकार्यक्षम मंत्री कारणीभूत आहेत, असा आरोप मंत्री दीपक केसरकर यांनी केला. महाविकास आघाडी सरकारमध्ये आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) पर्यटनमंत्री होते.

पंतप्रधान ग्रामसडकच्या अधिकाऱ्यांची 'हजेरी'

पंतप्रधान ग्रामसडक योजनेची कामे अद्याप सुरू न झाल्याने या वेळी मंत्री केसरकरांनी उपस्थित अधिकाऱ्यांना झापले. यासंदर्भात लगेचच सर्व ठेकेदारांना बोलवा आणि बैठक घ्या. ठेकेदार ऐकत नसल्यास झालेल्या त्यांच्या कामाची कॉलिटी कंट्रोलमार्फत चौकशी लावून संबंधित ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकून नवीन ठेकेदार नेमा, सात दिवसांत निविदा न भरल्यास फेरनिविदा काढा, या शब्दांत केसरकरांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

या वेळी केसरकरांसोबत माजी उपनगराध्यक्ष तानाजी वाडकर, अॅड. अरुण पणदूरकर, बाबू कुडतरकर, प्रेमानंद देसाई उपस्थित होते.

(Edited by Avinash Chandane)

R

Rajan Teli, Deepk Kesarkar
Chiplun Rane Jadhav Clash : अटक झालेल्या कार्यकर्त्यांच्या घरी भास्कर जाधव; 'शेठ तुम्ही असताना...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com