Sanjay raut- Narayan Rane
Sanjay raut- Narayan Rane  Sarkarnama
मुंबई

आता नारायण राणे बॉम्ब फोडणार; राऊतांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी मैदानात!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (ता. १५ फेब्रुवारी) दुपारी पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्ष आणि पक्षाच्या नेत्यांवर अनेक गंभीर आरोप केले. त्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) उद्या (ता. १६ फेब्रुवारी) उत्तर देणार आहेत. राणे हे उद्या संजय राऊत आणि शिवसेनेवर काय हल्लोबाल करणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Narayan Rane will answer Sanjay Raut's allegations)

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या हेही उद्या सकाळी अकरा वाजता दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहेत, ते राऊतांच्या आरोपांवर दिल्लीत काय निशाणा साधणार याची चर्चा राज्यात रंगली आहे.

संजय राऊत यांनी आज मुंबईत शिवसेना भवनात आमदार-खासदारांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करत पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, नील सोमय्या, मोहित कंबोज यांच्यासह माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आरोप केले आहेत. त्याला भाजप नेत्यांकडून उत्तर देण्यात आले. मात्र, उद्या राणे आणि सोमय्या कोणता बॉम्ब टाकणार याकडे राजकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उद्या बुधवारी (ता. १६ फेब्रुवारी) दुपारी चार वाजता भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत.

संजय राऊत यांनी भाजपवर केलेले ठळक आरोप...

१) महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजप नेत्यांकडून धमकी

२) सरकार पाडण्यासाठी मदत न केल्यास टाईट करण्याची धमकी

३) देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप, त्यांच्या काळात महाआयटीमध्ये सुमारे ५ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार

४)फडणविसांच्या काळातील पाच हजार कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब माझ्याकडे. आधी EOW कडे तक्रार करणार आणि नंतर हे प्रकरण ईडीकडे जाणार

५) राकेश वाधवान यांच्यापासून 12 हजार कोटी रुपयाची जमीन मोहित कंबोजने 100 कोटी रुपयांत खरेदी केली

६) मोहित कंबोज हा फडणवीसांचा फ्रंट मॅन, तो फडणविसांना बुडविणारा आहे

७) ईडीच्या लोकांनी 80 वर्षांच्या वृद्धाला पकडून नेले. तो रडत होता.

८) महाराष्ट्र, बंगाल आणि झारखंड येथील सरकारे पाडण्याचे कारस्थान

९) मुंबईतील प्रतिष्ठित बिल्डरांकडून ईडीच्या नावाखाली वसुली सुरू आहे. मुंबईतील साठ बिल्डरांकडून तीनशे कोटींची वसुली.

१०)जितेंद्र चंद्रालाल नवलाणी हा कोण आहे? हे नाव ऐकून दिल्लीतील ईडीच्या लोकांना श्वास रोखेल.

११ PMC बॅंक घोटाळ्याचा तपास ईडी करत आहे. सोमय्या यांच्या भ्रष्टाचाराचे कागद मी ईडीला पाठवले आहेत.

१२) राजेंद्र लखाणी हा सोमय्या यांचा फ्रॅंटमॅन

१३) निकाॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कोणाची आहे? ही सोमय्यांची कंपनी आहे. PMC घोटाळ्यातील आरोपी वाधवान याला ब्लॅकमेल करून सोमय्यांनी 80 ते 100 कोटी रुपयांची रोकड घेतली.

१४)निकाॅन कन्स्ट्रक्शनमार्फत दोन ठिकाणी जमीन घेतली. या कंपनीचे सर्व प्रकल्प रद्द करा, असे माझे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना आवाहन आहे.

१५)किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना तातडीने अटक करा.

१६) PMC बॅंक घोटाळ्यातील पैसे मी वापरत असल्याचा सोमय्या सांगतात. पण त्यातील राकेश वाधवानने वीस कोटी रुपये भाजपच्या अकौंटमध्ये गेले आहेत.

१७) एक दूधवाला पाच वर्षांत सात हजार कोटींचा मालक कसा झाला?

१८) माजी वनमंत्री सुधीर मुनगंटिवार यांच्या मुलीच्या लग्नाबद्दल आम्ही काही बोललो का? त्यांच्या मुलीच्या लग्नातील सेट साडेनऊ कोटी रुपयांचा होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT