सोमय्यांचे आव्हान; ठाकरे सरकारने माझी व कुटुंबियांची जरूर चौकशी करावी

ईडीने अटक केलेले प्रवीण राऊत तसेच सुजीत पाटकर यांच्याबाबत खासदार राऊत यांनी खुलासा करण्याची आवश्‍यकता आहे.
Kirit Somaiya
Kirit SomaiyaSarkarnama
Published on
Updated on

पुणे : दैनिक सामनातून संजय राऊत यांनी २०१७ साली माझ्या पत्नीच्या नावाने असेच आरोप केले होते. आज त्याच बांधकाम व्यावसायिकाचे नाव घेऊन माझ्या मुलावर आरोप केले जात आहेत.या आरोपाबाबत ठाकरे सरकारने माझी जरूर चौकशी करावी,असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे नेते नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी दिले आहे.

Kirit Somaiya
पुण्यात भाजपा-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातूनच सर्वाधिक हरकती-सूचना

डॉ. सोमय्या म्हणाले, ‘‘ ठाकरे सरकारने माझ्याविरुद्ध आतापर्यंत १० गुन्हे दाखल केले आहेत. आणखी तीन दाखल होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.आता आणखी एका चौकशीस मी तयार आहे. खुशाल चौकशी करा. मी व माझ्या कुटुंबियांचा कोणत्याही भ्रष्ट,चुकीच्या व्यवहारात सहभाग नाही. खासदार राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत कोविड उपचार केंद्रातील गैरव्यवहाराबाबत मी केलेल्या आरोपांबाबत तसेच त्यांचे प्रवीण राऊत, सुजीत पाटकर यांच्याशी असलेल्या संबंधाबाबत एक शब्दही उच्चारला नाही.’’

Kirit Somaiya
पुणे पालिकेत स्थायी समितीचा अध्यक्ष ठरणार ‘श्रीयाळशेठ’?

माझ्या करण्यात आलेल्या आरोपांची जरूर चौकशी करावी.कोणत्याही चौकशीस मी तयार आहे.मात्र, जम्बो कोवीडमधील भ्रष्टाचाराबाबतही खासदार राऊत यांनी बोलले पाहिजे. या साऱ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.या प्रकरणाचा मी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. पोलिसांकडे त्रकारी देत आहे. मातत्र, या प्रकरणी गुन्हा दाखल होत नाही. राज्य सरकारच्या दाबावामुळे पुढे कोणतीच कारवाई होत नसल्याचा आरोप सोमय्या यांनी केली.

ईडीने अटक केलेले प्रवीण राऊत तसेच सुजीत पाटकर यांच्याबाबत खासदार राऊत यांनी खुलासा करण्याची आवश्‍यकता असताना हा विषय टाळून सर्व विषयावर ते बोलत आहेत.संदर्भ नसलेले विषय पत्रकार परिषदेत बोलण्यापेक्षा नेमक्या विषयावर बोलावे, जेणेकरून लोकांना वस्तुस्थिती लक्षात येइल, असे सोमय्या यांनी सांगितले.

Editedb By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com